New Hyundai Santro At Just 10,100 Rs Check Out
नवी कोरी सँट्रो केवळ 10,100 रुपयांत घरी न्या...पाहा कसे ते... By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 04:13 PM2018-10-25T16:13:36+5:302018-10-25T16:35:54+5:30Join usJoin usNext ह्युंदाई या कंपनीने आपली सर्वात लाडकी कार सँट्रो नव्या रुपात भारतात लाँच केली आहे. लाँचिंगपूर्वीच या कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर बुकिंग सुरु झाल्याच्या पहिल्या 12 दिवसांत 23 हजार कारची नोंदणी झाल्याचे कंपनीने सांगितले होते. ही कार आता केवळ 10,100 रुपयांत घरी नेता येणार आहे. होय हे खरे आहे...पाहा कसे ते. जर तुम्ही ही नवीन सँट्रो कार घेण्यास इच्छुक असाल तर ही माहिती फायद्याची आहे. सँट्रोची आगाऊ बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली होती. ही बुकिंग अधिकृत वेबसाईटवरून केली जाऊ शकते. यासाठी 11,100 रुपये द्यावे लागणार आहेत. मग आम्ही 10,100 कसे म्हणतोय..पाहा. जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि तुमच्याकडे या बँकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड असेल तर हे शक्य आहे. एचडीएफसीचे कार्ड वापरल्यास बुकिंगच्या रकमेमध्ये 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. मात्र, यामध्येही एक अट आहे. जर तुम्ही एचडीएफसीकडून सँट्रोसाठी कर्ज घेणार असला, तरच ही 1 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच याच पैशांमध्ये तुम्ही सँट्रो कार घरी घेऊन जाऊ शकणार आहात. सँट्रो कारचे Dlite, Era, Magna, Sportz आणि Asta असे पाच व्हेरिअंट आहेत. यामध्ये Magna आणि Sportz व्हेरिअंटमध्येच सीएनजीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे सीएनजी फॅक्टरी फिटेड असणार आहे. तसेच ड्रायव्हर एअरबॅग आणि एबीएस सर्व व्हेरिअंटमध्ये देण्यात आले आहे. नव्या सँट्रोमध्ये 1.1 लीटरचे 4 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 69 पीएस ताकद आणि 99 एनएम टॉर्क उत्पन्न करते. तर सीएनजी व्हेरिअंट 58 बीएचपी ताकद आणि 84 एनएम टॉर्क उत्पन्न करते. याचबरोबर 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मॅग्ना आणि स्पोर्ट व्हेरिअंटमध्ये 5-स्पीड एएमटी गियरबॉक्स मिळणार आहे. मात्र, सीएनजीसाठी केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन असणार आहे. पेट्रोलवर मॅन्युअल आणि अॅटो ट्रान्समिशनसाठी 20.3 किमी चे मायलेज तर सीएनजीसाठी 30.5 किमी प्रतिकिलोचे मायलेज मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. कारचा सर्वाधिक वेग 150 किमी प्रति तास आहे. तसेच 7 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो आणि मिरर लिंक सारखे फिचर देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे मागे बसणाऱ्यांसाठी रिअर एसी व्हेंटही देण्यात आला आहे. पार्किंगसाठी रिअर पार्किंग कॅमेराही देण्यात आला आहे. कीलेस एन्ट्रीचीही सुविधा आहे. टॅग्स :ह्युंदाईकारHyundaicar