New Hyundai Tucson 2022: नव्या ह्युंदाई 'टक्सन'वरुन पडदा उठला, जबरदस्त लूक अन् फिचर्सनं लक्ष वेधलं; किंमत किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:37 PM2022-07-13T17:37:52+5:302022-07-13T17:44:42+5:30

New Hyundai Tucson 2022: भारतातील दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाईची बहुप्रतिक्षीत टस्कन कार भारतात लॉन्च झाली आहे. जबरदस्त लूक आणि फिचर्सनं कारनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर एकदा ही माहिती जरुर वाचा...

ह्युंदाईच्या नव्या टक्सन कारचा लूक अखेर उघड करण्यात आला आहे. कंपनीनं भारतीय बाजारपेठेत अधिकृतरित्या ह्युंदाई टक्सन कारचा लूक जाहीर केला आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी कारचा रितसर लॉन्चिंग सोहळा होणार आहे. त्यानंतरच कारची डिलिव्हरी देखील तात्काळ सुरू करण्यात येणार आहे.

भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई टक्सनच्या नव्या कारची खूप उत्सुकता होती. अखेर कंपनीनं आज टक्सन कारचा लूक सर्वांसमोर आणला आहे.

न्यू जनरेशन Hyundai Tucson सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक अपडेट्ससह लॉन्च केली जाईल आणि कंपनीच्या भारतीय उत्पादन लाइन-अपमधील ही फ्लॅगशिप SUV असेल.

डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास टक्सन कार अगदी स्पोर्टी डिझाइन लँग्वेजसह सुसज्ज असेल.

जागतिक स्तरावर, फोर्थ-जनरेशन Hyundai Tucson दोन पेट्रोल, एक हायब्रिड आणि एक ऑइल-बर्नर इंजिनसह ऑफर केली जाते.

ऑल-एलईडी हेडलॅम्पसह नवीन पॅरामेट्रिक ग्रिल कारला देण्यात आलं आहे, तर तळाशी आकर्षक फॉग लॅम्पही आहे.

भारतात मात्र विशिष्ट मॉडेल 2.0-लिटर पेट्रोल इंजिनसह ही कार उपलब्ध करुन दिला जाईल असं म्हटलं जात आहे. 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील असणार आहे.

याशिवाय 2.0-लिटर डिझेल इंजिन 8-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर AT सह कार उपलब्ध करुन दिली जाऊ शकते असंही सांगण्यात येत आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी कारची किंमतही जाहीर केली जाईल.

कंपनीने अलीकडेच आपल्या लोकप्रिय आणि स्वस्त मध्यम आकाराच्या कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue चं लेटेस्ट व्हर्जन लॉन्च केलं आहे. लॉन्च होताच या कारला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

नवीन एसयूव्हीचे डिझाईन आणि त्यातील फीचर्स लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. खास गोष्ट म्हणजे त्याची सुरुवातीची किंमत 7.53 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 9.99 लाख रुपये आहे.