लाँच होताच Maruti Suzuki Baleno नं टाकलं सर्वांना मागे; याबाबतीत बनली नंबर १; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:10 PM2022-02-24T14:10:57+5:302022-02-24T14:28:28+5:30

Maruti Suzuki Baleno 2022 : भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक बलेनोचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे.

Maruti Suzuki Baleno 2022 : भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक बलेनोचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. परंतु लाँच होताच या कारनं धुमाकूळ घातला आहे.

ग्राहकांमध्ये या कारची क्रेझ इतकी आहे की कंपनीला आतापर्यंत 25000 हजार बुकिंग मिळाले आहेत. याशिवाय या कारने लाँच झाल्यानंतर अनेक वाहनांना मागे टाकले आहे. जाणून घेऊया काय आहे विशेष या कारमध्ये.

फ्युअल एफिशि्न्सीच्या बाबतीत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार बलेनोच्या मॅन्युअल आणि ऑटो मॉडेलचं मायलेज 22.34kmpl आणि 22.94kmp इतकं आले आहे.

ह्युंदाई आय 20 च्या मॅन्युअल आणि ऑटो मॉडेलचं मायलेज 20.35kmpl आणि 19.65kmpl आहे. तर टाटा अल्ट्रोजच्या मॅन्युअल मॉडेलचं मायलेज 19.05 kmpl आहे. Volkswagen Polo TSI च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्सचे मायलेज 18.24kmpl आणि 16.47kmpl आहे.

याशिवाय Honda Jazz च्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मॉडेल्सचे मायलेज 16.6kmpl आणि 17.1kmpl आहे. या आकडेवारीच्या आधारे, असे म्हणता येईल की नवीन Baleno ही तिच्या प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील सर्वात जास्त मायलेज देणारी कार ठरली आहे. या बाबतीत या कारनं अन्य कार्सना मागेही टाकलं आहे.

मारुती सुझुकीच्या प्रीमियम हॅचबॅक 2022 Baleno ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.35 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये एवढी आहे. महत्वाचे म्हणजे यात कंपनीने अनेक नवे फीचर्स दिले आहेत.

2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्ट मायलेज वाढवण्यासाठी स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन 1.2-लीटर के-सीरीज ड्युअल जेट, ड्युअल VVT पेट्रोल इंजिनसह देण्यात आलं आहे.

हे इंजिन 88.5 एचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT (AGS) ला जोडलेले आहे. कंपनी यामध्ये 22.94 kmpl पर्यंत मायलेज देण्याचा दावा करते.

नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनो फेसलिफ्टमध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. यात Android Auto, Apple CarPlay आणि 40+ कनेक्टेड कार फीचर्ससह नवीन 9.0-इंचाचा SmartPlay Pro+ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलाय.

इतर नव्या हाय-टेक फीचर्ससह हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अलेक्सा कनेक्ट, एक ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, मागील बाजूस एसी व्हेंट्स आणि सहा एअरबॅग्ज, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट सारख्या सेफ्टी इक्विपमेंट्सचाही समावेश आहे.

मारुती सुझुकी चार ट्रिम लेव्हलमध्ये नवीन बलेनो ऑफर करत आहे. सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा यामध्ये ही कार उपलब्ध आहे. भारतातील नवीन 2022 मारुती सुझुकी बलेनोच्या फेसलिफ्टची किंमत 6.35 लाख ते 9.49 लाख रुपये, एक्स-शोरूमच्या दरम्यान आहेत.

यासाठी बुकिंग आधीच सुरू करण्यात आलं असून केवळ 11,000 रुपये टोकन रक्कम भरून ही प्रीमियम हॅचबॅक बुक करता येईल. या कारची स्पर्धा Hyundai i20, Honda Jazz, Tata Altroz, या कार्सशी असेल.