Mahindra Bolero चं नवं व्हेरिअंट झालं लाँच; जबरदस्त फीचर्ससह मिळणार उत्तम मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 06:34 PM2021-08-21T18:34:31+5:302021-08-21T18:39:21+5:30

Mahindra and Mahindra Bolero Launch : देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी महिंद्रानं गेल्या महिन्या SUV Bolero केली होती लाँच. कंपनीनं आता लाँच केलं या एसयूव्हीचं नवं व्हेरिअंट.

देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी Mahindra नं गेल्या जुलै महिन्यात आपल्या बेस्ट सेलिंह एसयूव्ही Bolero ला लाँच केलं होतं. त्यावेळी कंपनीनं Bolero चे तीन व्हेरिअंट लाँच केले होते.

या तीन व्हेरिअंट्समध्ये N4, N8 आणि N10 चा समावेश होता. परंतु आता कंपनीनं या कारचं आणखी एक नवं व्हेरिअंट लाँच केलं आहे. कंपनीनं याला N10 (O) असं नाव दिलं आहे.

आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमता असलेल्या या नव्या व्हेरिअंटची किंमत 10.69 लाख रूपये निश्चित करण्यात आली आहे.

हे नवं व्हेरिअंट पाच रंगांमध्ये उपलब्ध असून त्यात रॉकी बेज, मॅजेस्टीक सिल्व्हर, हायवे रेड, पर्ल व्हाईट आणि नेपोली ब्लॅक या रंगांचा समावेश आहे.

यामध्ये मल्टी टेरेन टेक्नॉलॉजीचा (मॅन्युअल लॉक डिफरेंन्शिअल) वापर करण्यात आला आहे. याशिवाय अन्य सर्व फीचर्स हे इतर व्हेरिअंट्स प्रमाणेच देण्यात आले आहेत.

कंपनीनं नव्या बोलेरोमध्ये 1.5 लीटर क्षमतेच्या डिझेल इंजिनचा वापर केला आहे. हे इंजिन 100bhp ची पॉवर आणि 260Nm चा टॉर्क जनरेट करतं.

हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गियरबॉक्ससह येतं. कंपनीनं दावा केला आहे की यात देण्यात आलेली ESS मायक्रो हायब्रिड टेक्नॉलॉडी आणि इको मोड याचं मायलेज अधिक चांगलं करतात.

Bolero Neo N10 (O) व्हेरिअंटमध्ये प्रीमिअल इटालियन थीमचा वापर करण्यात आला आहे. यात पुढे आणि मागे बसण्याच्या जागांववर आर्मरेस्ट देण्यात आला आहे.

याशिवाय डॅशबोर्डमध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि सेंटर कन्सोलमधअये सिल्व्हर अॅक्सेंटद्वारे हायलाईट करण्यात आलं आहे.

अन्य फीचर्समध्ये अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, पॉवर विंडो, रिमोट लॉक किलेस एन्ट्रीसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.