Ninety One E Cycles : ४ मोड्स असलेली इलेक्ट्रीक सायकल लाँच; ३५ किमीची रेंज, किंमतही बजेटमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:43 PM2022-02-19T12:43:18+5:302022-02-19T12:45:50+5:30

भारतातील वेगाने वाढणाऱ्या सायकल ब्रँड Ninety One Cycles ने नवीन इलेक्ट्रीक सायकल Meraki S7 ची घोषणा केली आहे.

भारतातील वेगाने वाढणाऱ्या सायकल ब्रँड Ninety One Cycles ने नवीन इलेक्ट्रीक सायकल Meraki S7 ची घोषणा केली आहे. मेराकीनंतर कंपनीची ही दुसरी ई-बाईक (सायकल) आहे.

मेराकीमध्ये देण्यात आलेल्या सर्व फीचर्स व्यतिरिक्त नवीन इलेक्ट्रीक सायकलमध्ये 7-स्पीड गियरसेट, 5-मोड पेडल असिस्ट आणि एक स्मार्ट एलसीडी देण्यात आला आहे. याद्वारे वेगाची माहिती मिळण्यास मदत होते. जाणून घेऊया या सायकलबद्दल अधिक माहिती.

ही इलेक्ट्रीक सायकल मिडनाईट ब्लॅक, ग्रेसफुल ग्रे आणि इलेक्ट्रिक ऑरेंज या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेन आणि डस्टप्रुफ असण्याव्यतिरिक्त ही सायकल 160mm डिस्क ब्रेक आणि हाय-ट्रॅक्शन नायलॉन टायरसह देखील येते. यात की-लॉक स्विचसह रुंद हँडलबार मिळतात.

ही इलेक्ट्रीक सायकल पूर्ण चार्ज केल्यावर 35 किमी पर्यंतची रेंज देईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसंच या सायकलचा टॉप स्पीड 20 किमी/तास आहे.

या सायकलमध्ये चार रायडिंग मोड मिळतात. यामध्ये पेडल असिस्ट, थ्रॉटल मोड, पेडल मोड आणि क्रूझ मोड यांचा समावेश आहे. पेडल असिस्टमध्ये तुम्हाला पेडल वापरण्याच्या सोबतच इलेक्ट्रीक पॉवरही वापरू शकता.

थ्रॉटल मोडमध्ये, तुम्ही ते इलेक्ट्रीक स्कूटरप्रमाणे ही सायकल चालवू शकता. यामध्ये तुम्हाला पेडल मारण्याची गरज नाही. परंतु या मोडमध्ये बॅटरीचा वापर अधिक होतो.

त्याच वेळी, पेडल मोडमध्ये, ते सामान्य सायकलसारखे काम करेल. या मोडमध्ये तुम्हाला फक्त पेडलच्या माध्यमातूनच सायकल चालवावी लागेल. क्रूझ कंट्रोलमध्ये सायकल 6 किमी/तास वेगाने सेट केली जाईल. कंपनीने या ई-सायकलची किंमत 34,999 रुपये इतकी निश्चित केली आहे.