सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:51 PM 2021-12-21T15:51:14+5:30 2021-12-21T16:09:09+5:30
कार मेकर कंपनी 'निओ'ने एक इलेक्ट्रीक कार सादर केली आहे. या कारची थेट टक्कर टेस्लाच्या लोकप्रिय मॉडल 3 सेडानसोबत असेल. जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स... वाढत्या इंधनाच्या दरामुळे मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. पण, चार्जिंग पॉइंट आणि ड्रायविंग रेंजमुळे आजही अनेकजण या इलेक्ट्रीक वाहनांबद्दल साशंक आहेत.
पण, आता या शंकेचे निरसन करण्यासाठी 'निओ' नावाची कंपनी पुढे आली आहे. चीनी ईव्ही निर्माता कंपनी निओने आपली दुसरी सर्व-इलेक्ट्रिक सेडान कार 'निओ ईटी 5' सादर केली आहे.
कंपनीने आपल्या वार्षिक कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी All Electric ET 5 सादर केली आहे. पुढील वर्षी सप्टेंबरपासून ही कार फक्त चीनमध्ये उपलब्ध होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, या कारची सुरुवातीची किंमत 3,28,000 युआन (38,93,918 रुपये) ठेवण्यात आली आहे. एंट्री-लेव्हल टेस्ला मॉडेल 3 ची किंमत चीनमध्ये 30.36 लाख रुपये आहे.
Neo ET 5 इलेक्ट्रिक सेडानमध्ये पुढील बाजूस 150kWh, तर मागील बाजूस 210kWh पॉवर देण्यात आली आहे. चालकाला एकूण 483 hp पॉवर आणि 700 Nm टॉर्क मिळतो. इंजिन 4.3 सेकंदात 0-100 किमीचा पल्ला गाठू शकते.
कंपनीने इनहाऊस 4 पीस फिक्स्ड क्लिपर्स विकसित केले आहेत, जे अॅल्युमिनियम कास्टिंगसह येतात. ET5 रेंज चाचणीदरम्यान 75kWh बॅटरीवर 550 किमी ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.
तर, लांब पल्ल्यासाठी 100kWh क्षमतेच्या बॅटरीसह 700 किमीची श्रेणी आणि 150kWh क्षमतेच्या बॅटरीसह 1000 किमीची रेंज मिळवता येते.
तंत्रज्ञानामध्ये यात 10.2-इंचाचा HDR डिस्प्ले आहे, जो कारच्या डॅशबोर्डच्या मध्यभागी आहे. या प्रणालीमध्ये एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
या इलेक्ट्रीक सेडानची टक्कर टेस्लाच्या एंट्री लेव्हल मॉडेल 3 शी असेल. ही कार चीनमध्ये पुढील वर्षी उपलब्ध होणार आहे. भारतात ही गाडी कधी मिळेल याची अद्याप माहिती नाही.