Now take 8 or 13 people in one car; know about The price of Force Trax Cruiser 13 seater car
चिंता कशाला? आता ८ काय १३ माणसं एकाच कारमधून घेऊन जा; १३ सीटर या कारची किंमत... By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 01:51 PM2022-12-19T13:51:55+5:302022-12-19T13:55:10+5:30Join usJoin usNext एखाद्या पिकनिकला जाताना कुटुंब मोठे आणि कार लहान अशी वेळ तुमच्यावरही आली असेल. या परिस्थितीत तुम्हाला एकत्र कुठेही फिरणे अशक्य होते. ७ ते ८ सीटर कारही कमी पडत असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही तुम्ही ५ सीटर, ६ सीटर, ७ सीटर आणि ८ सीटर कार बद्दल खूप ऐकले असेल पण भारतात १३ सीटर कार देखील आहे हे क्वचितच माहित नसेल. होय, १३ सीटर कार देखील येते. पण, ही टाटा किंवा महिंद्राची कार नसून फोर्स मोटर्सची कार आहे. क्रूझर कार तुमच्यासाठी कुटुंबासाठी सर्वोत्तम असेल. या १३ सीटर कारमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र प्रवासाचा आनंद घेऊ शकणार आहे. फोर्स मोटर्सच्या फोर्स ट्रॅक्स क्रूझरमध्ये तुम्हाला १० आणि १३ सीटरचा पर्याय मिळेल. फोर्स मोटर्सची ट्रॅक्स क्रूझर (Force Trax Cruiser) दोन सीटिंग लेआउट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. १० सीटर (9+D) आणि १३ सीटर (12+D) पर्याय आहेत. १० सीटर व्हेरियंटमध्ये ९ प्रवासी आणि एक ड्रायव्हर आहे तर १३ सीटर व्हेरिएंटमध्ये १२ प्रवासी आणि एक ड्रायव्हर आहे १३ सीटर कॉन्फिगरेशन असलेल्या मॉडेलमध्ये ड्रायव्हर आणि पुढच्या बाजूला प्रवासी सीट आहे. दुसऱ्या रांगेत तीन प्रवासी (बेंच सीट) जागा आहेत. त्याच वेळी, मागील बाजूस समोरासमोर दोन बेंच सीट आहेत, ज्यामध्ये ४ लोक बसू शकतात. म्हणजेच मागच्या बाजूला एकूण ८ लोक बसतात. अशा प्रकारे एकूण १३ लोकांसाठी बसण्याची सोय आहे. दुसरीकडे, १०-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये, पुढच्या बाजूला ड्रायव्हरसह दोन प्रवासी जागा आहेत. दुसऱ्या रांगेत तीन पॅसेंजर (बेंच सीट) सीट्स आणि मागील बाजूस दोन फ्रंट-टू- बॅंच सीट आहेत ज्यात ४ लोक बसू शकतात. फोर्स ट्रॅक्स क्रूझर 2596CC, BS-VI, 4 सिलेंडर, कॉमन रेल DI TCIC इंजिन (डिझेल) मध्ये येते. जे 67kW@3200rpm आणि 250 Nm@1400-2400rpm पॉवर/टॉर्क आउटपुट तयार करते. यात पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या कारची किंमत सुमारे १६.०८ लाख रुपयांपासून सुरू होते आणि सुमारे १८.०० लाख रुपये ऑन रोड किंमत आहे. (On Road Delhi) मात्र या कारमध्ये जास्त फिचर्स नाहीत. या किंमतीच्या श्रेणीमध्ये बाजारात आणखी अनेक फिचर्सच्या कार आहेत परंतु त्या इतक्या आसन क्षमतेसह येत नाहीत. अलीकडेच कंपनीनं फोर्स अर्बानिया(Force Urbania) लाँच केली होती. आकर्षक लूक आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेली ही व्हॅन तीन वेगवेगळ्या सीटिंग कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केली आहे. ज्यामध्ये १०-सीटर, १३-सीटर आणि १५-सीटर पर्याय उपलब्ध आहेत. नवीन Force Urbania ची सुरुवातीची किंमत २८.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये देण्यात येत असल्याचा फोर्स मोटर्सचा दावा आहे. ही देशातील पहिल्या पूर्णपणे ग्राउंड-अप, मॉड्यूलर पॅनेल व्हॅन प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे.