Ola Electric Scooter Ola S1 Pro: ओला स्कूटर पुन्हा चर्चेत; होळीचा अकरावा रंग! या दिवशी सुरु होतेय विक्री विंडो By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 12:39 PM 2022-03-15T12:39:57+5:30 2022-03-15T12:52:25+5:30
Ola Electric Scooter Ola S1 Pro in New color Gerua: कंपनीने खरेदीची विंडो पुन्हा सुरु करण्याची घोषणा करतानाच होळीच्या निमित्ताने अकरावा रंग लाँच केला आहे. याचबरोबर घरोघरी जाऊन टेस्ट ड्राईव्ह दिली जात आहे. ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंपनीने बुकिंग पुन्हा सुरु करण्याची घोषणा करतानाच होळीच्या निमित्ताने अकरावा रंग लाँच केला आहे. याचबरोबर घरोघरी जाऊन टेस्ट ड्राईव्ह दिली जात आहे. पुण्यात आधी ४९९ रुपये देऊन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना यासाठी फोन येऊ लागले आहेत.
Ola Electric Scooter Ola S1 Pro च्या खरेदीची विंडो पुन्हा एकदा उघडली जाणार आहे. याचसोबत स्पेशल एडिशन कलर 'गेरुआ' देण्यात येणार आहे. हा रंग फक्त १७ आणि १८ मार्च या दोनच दिवशी उपलब्ध असणार आहे.
कंपनीचे सहसंस्थापक सीईओ भाविश अग्रवाल यांनी याची माहिती ट्विटरवर दिली आहे. ज्या ग्राहकांनी आधीच बुकिंग केले आहे त्यांना १७ मार्चला ओला ईलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करता येणार आहे. तर ज्यांनी अद्याप ४९९ रुपये देऊन बुकिंग केलेले नाही त्यांना म्हणजेच सर्वांना १८ मार्चला खरेदी करता येणार आहे.
हा अकरावा रंग याच दोन दिवशी उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय तुम्ही अन्य १० रंगांपैकी कोणताही रंग निवडू शकणार आहात. पैसे पूर्णपणे डिजिटल ट्रान्सफर करावे लागणार आहेत. ते ओला अॅपवरूनच करावे लागणार आहेत.
या दोन दिवसांत जे लोक खरेदी करतील त्यांना एप्रिल २०२२ पासून डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल. ही स्कूटर ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत आणून दिली जाणार आहे. तुमच्या माहितीसाठी ओलाची स्कूटर १३५ किमीची ट्रू रेंज देते. ही स्कूटर घेतल्यानंतर काही ग्राहक मुंबईतून लोणावळ्याला फिरून आलेले आहेत.
जगातील सर्वात मोठा 2W EV प्लांट ही स्कूटर तामिळनाडू येथील ओला फ्युचरफॅक्टरीमध्ये तयार केली जात आहे. हा जगातील सर्वात मोठा आणि प्रगत दुचाकी प्लांट असल्याचे बोलले जात आहे. 500 एकरांवर पसरलेल्या 'फ्यूचरफॅक्टरी'मध्ये केवळ महिला कर्मचारी आहेत. पूर्ण क्षमतेसह, या संयंत्राची वार्षिक उत्पादन क्षमता 10 दशलक्ष (एक कोटी) युनिट्स असेल.
किंमत किती आहे ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro ट्रिममध्ये उपलब्ध आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 व्हेरियंटची किंमत 1 लाख रुपये आहे, तर S1 Pro व्हेरियंटची किंमत 1.30 लाख रुपये आहे. ही किंमत एक्स-शोरूम आणि राज्याची सबसिडी विरहित आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देखील देशातील विविध राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणाऱ्या सबसिडीनुसार बदलू शकतात.
ड्रायव्हिंग श्रेणी आणि वेग Ola S1 एका चार्जवर 121 किमी अंतर तर S1 Pro प्रकार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 181 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते. या एआरएआय फिगर्स आहेत. S1 Pro 3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. त्याच वेळी, या स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे.
S1 आणि S1 प्रो दोन्ही मॉडेल्स अनेक वैशिष्ट्यांसह येतात. स्कूटर चावीविरहित असून मोबाइल फोन अॅप वापरून सुरू करता येते. यामध्ये मल्टी ड्रायव्हर प्रोफाइल तयार करता येतात. भविष्यात, कंपनी अॅप अपडेट्सद्वारे पालक नियंत्रणे आणि जिओफेन्सिंग यांसारखी अनेक वैशिष्ट्ये वाढवू शकते.
18 मिनिटांत 50% चार्जिंग ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर ई-स्कूटरची बॅटरी केवळ 18 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज करते. म्हणजेच ७५ हून अधिक किमी अंतर कापू शकता.