OLA Electric Scooter new Price: ओलाच्या ई स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात; महाराष्ट्रात एवढ्याला मिळणार... By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:34 AM 2021-09-15T10:34:50+5:30 2021-09-15T10:45:30+5:30
Big reduction in the price of Ola's e-scooter In Maharashtra: दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सबसिडी लाईव्ह झाली असून याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आहे. ओलाने नवीन किंमती आजच्या बुकिंगच्याच दिवशी जाहीर केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून ओलानं ईलेक्ट्रीक स्कूटरची (OLA Electric Scooter) दोन व्हेरिअंट लाँच केले. मात्र, याची किंमत लाख आणि सव्वा लाखाच्यावर होती. परंतू आता महाराष्ट्रातील आणि केंद्राची सबसिडी लाईव्ह झाली असून ओलाच्या स्कूटरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. (Have you reserved your Ola Scooter? Then brace yourselves for priority purchase on 8th September. To know more)
व्हेरिअंट S1 आणि S1 Pro या दोन स्कूटर ओलाने लाँच केल्या होत्या. एस 1ची किंमत 99,999 रूपये आणि Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रूपये एवढी ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रात सबसिडीनंतर ही किंमत 94,999 रूपये आणि 1,24,999 रूपये एवढी कंपनीने जाहीर केली होती. (How to Purchase Ola Electric Scooter Ola S1. )
परंतू दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सबसिडी लाईव्ह झाली असून याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आहे. ओलाने नवीन किंमती आजच्या बुकिंगच्याच दिवशी जाहीर केल्या आहेत. यामध्ये दोन्ही स्कूटरमागे ग्राहकांचे जवळपास 25000 रुपये वाचणार आहेत.
नव्या किंमतीनुसार ओलाची महाराष्ट्रातील किंमत ola s1 ची 75099 आणि Ola S1 Pro ची 100149 एवढी झाली आहे. या किंमती देशभरात सर्वात कमी आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील ईव्ही पॉलिसी ही इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक चांगली आहे. (OLA Electric Scooter new Price in Maharashtra EV subsidy live)
ओला आजपण तोंडघशी पडली कंपनीने ओला स्कूटर फायनल बुकिंग म्हणजेच खरेदी, कर्ज प्रक्रिया करण्यासाठी 8 सप्टेंबरची तारीख दिली होती. परंतू कंपनीला ते काही शक्य झाले नव्हते. अखेर तांत्रिक अडचण पुढे करून ओलाने पन्हा 15 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासूनची वेळ दिली होती.
आज सकाळी ओलाने आधी 499 रुपयांत बुकिंग केलेल्या लोकांना मेसेजही पाठविले. परंतू त्या लिंकवर क्लिक करतात ओला अजूनही चार्जच करतेय असा मेसेज आला. म्हणजे, ओलाची वेबसाईट ठप्प झाली आहे. सुरुवातीला काहींना लिंकवर गेल्यावर ओलाची स्कूटर रंगापर्यंत सिलेक्ट करता आली. परंतू नंतर सर्वच बंद पडले.
कशी खरेदी कराल? ओलाने कर्जावर स्कूटर घेणाऱ्यांसाठी ओला फायनान्स सर्व्हिस (by Ola Financial Services (OFS)) सुरु केली आहे. Ola S1 खरेदी करण्यासाठी तुम्ही अॅडव्हान्स देखील देऊ शकता. कर्ज काढून ओला स्कूटर घेण्यासाठी कंपनीने IDFC First Bank, HDFC, आणि TATA Capital सोबत हातमिळवणी केली आहे. यानुसार ईएमआय हे 2999 (for Ola S1) पासून सुरु होत असून Ola S1 Pro साठी 3199 रुपयांचा ईएमआय ठेवण्यात आला आहे.
how to get loan on Ola Scooter HDFC Bank आपल्या ग्राहकांना काही मिनिटांत प्री अॅप्रूव्हड लोन देत आहे. यासाठी ओला आणि ओला ईलेक्ट्रीक अॅप (Ola Electric App) वापरावे लागणार आहे. तर TATA Capital आणि IDFC First Bank डिजिटल केवायसी प्रक्रियेतून लोन देणार आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्ता आदी तयार ठेवावे लागणार आहे. (OLA Scooter booked? know PURCHASE PROCESS in Marathi.)
जर तुम्हाला कर्जाची गरज नसेल तर तुम्ही 20000 रुपये अॅडव्हान्स भरून Ola S1 आणि 25000 रुपये भरून Ola S1 Pro बुक करू शकणार आहात. उरलेली रक्कम ही स्कूटर डिलिव्हर होताना देता येणार आहे. डाऊन पेमेंट आणि अॅडव्हान्स हे रिफंडेबल असणार आहे. स्कूटर जोवर ओला फॅक्टरीतून शिप होत नाही, तोवर बुकिंग रद्द करता येणार आहे.
इन्शुरन्स कोण देणार... ओला स्कूटरचा इन्शुरन्स तुम्ही ओला आणि ओला ईलेक्ट्रीक अॅपवरून काढू शकता. सध्या कंपनीने ICICI Lombard चा इन्शुरन्स देऊ केला आहे. या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये 1 वर्षाचा ओन डॅमेज आणि 5 वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुर्स दिला जाणार आहे. याची किंमत वेगळी असू शकते. तसेच यामध्ये तुम्ही Personal Accident Cover, Zero Depreciation आणि Roadside Assistance अॅड ऑन घेऊ शकता.
टेस्ट राईड न घेताच कशी घ्यायची? कोणतीही स्कूटर, बाईक किंवा कार ही टेस्ट राईड घेतल्याशिवाय आपण घेत नाही. मोठ्या मोठ्या कंपन्या देखील फसवितात. राईड हँडलिंग, तुम्हाला कम्फर्टेबल आहे का, फिचर्स काय आहेत हे पाहिल्याशिवाय घेऊ नका. ओला ऑक्टोबर पासून टेस्ट राईड आयोजित करणार आहे. टेस्ट राईड घेतल्यानंतरच निर्णय घ्या. तसेच टेस्ट राईड घेतली की त्यानंतर फॅक्टरीतून शिप होईस्तोवर तुमच्याकडे बुकिंग रद्द करण्याचा पर्याय आहे.
Ola S1 ची डिलिव्हरी कधी? (Delivery of Your Ola S1) Ola S1 ची डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरु केली जाणार आहे. थेट घरी तुम्हाला की स्कूटर मिळणार आहे. शिप झाल्यावर उरलेली रक्कम भरावी लागणार आहे. जर तुम्ही पैसे देण्यास विलंब केला तर तुम्हाला मिळणारी स्कूटर दुसऱ्या ग्राहकाला दिली जाणार आहे. यानंतर तुम्हाला विलंबाने दुसरी स्कूटर दिली जाईल.
सरकारी सबसिडी मिळविण्यासाठी... सरकारी सबसिडी मिळविण्यासाठी तुम्हाला आधार, पॅन, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे. जर तुम्ही आधी ईव्हीसाठी सबसिडी घेतली असेल तर तुम्हाला दुसरी सबसिडी दिली जाणार नाही. तुमच्याकडे आधीची ईव्ही असेल तर त्याचे ईन्व्हॉईस सादर करावे लागणार आहे. (Have you reserved your Ola Scooter? Then brace yourselves for priority purchase on 8th September. To know more)