Pakistan Vs India Fuel Price: जास्त खुश होऊ नका? पाकिस्तानात ३५ रुपयांनी वाढले तरी भारतापेक्षा पेट्रोल, डिझेल खूप स्वस्त By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 03:39 PM 2023-01-30T15:39:56+5:30 2023-01-30T15:46:20+5:30
पाकिस्तानात आपल्यापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल आहे. त्याचे गणितच असे आहे की ते पाहून तुम्हालाही वाटेल आपल्याकडेच पेट्रोल-डिझेल महागडे आहे. जाणून घेऊया कसे... भारताशी लढून लढून पाकिस्तान कंगाल झाला आहे. आता तिथल्या लोकांवर हवा-पाण्यावर जगण्याची वेळ आली आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात पेट्रोलच्या किंमती ३०-३५ रुपयांनी वाढल्याचे वृत्त आले होते. यावेळी आपल्याकडे १००-१०६ आणि पाकिस्तानात २५०... असा आकडा पाहून अनेकांना हायसे वाटले असेल... पण जास्त खुश होण्याचे कारण नाहीय....
पाकिस्तानात आपल्यापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल आहे. त्याचे गणितच असे आहे की ते पाहून तुम्हालाही वाटेल आपल्याकडेच पेट्रोल-डिझेल महागडे आहे. जाणून घेऊया कसे...
पाकिस्तानमध्ये गव्हाचे पीठ, आजारांवरील औषधांची कमतरता आहे. पाकिस्तानचा खजिना दिवसेंदिवस रिता होत चालला आहे. या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला आहे. महागाईने होरपळणाऱ्या देशातील जनतेवर पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून सरकारने आणखी एक महागाईचा बॉम्ब फोडला आहे.
रविवारी (२९ जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३५ रुपयांनी वाढ करण्यात आली. पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price In Pakistan) 249.80 रुपये आणि डिझेलची किंमत 262.80 रुपये प्रति लिटर (पाकिस्तानमध्ये डिझेलची किंमत) झाली आहे. असे असले तरी भारतात त्यापेक्षा महागडे इंधन विकले जात आहे.
अमेरिकन डॉलरची किंमत जवळपास 260 पाकिस्तानी रुपयांवर गेली आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.६४ रुपयांच्या पातळीवर सुरु झाला. यानुसार एक भारतीय रुपया म्हणजे 3.10 पाकिस्तानी रुपये होतात.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहिल्या तर पाकिस्तानमध्ये एका डॉलरमध्ये एक लिटरपेक्षा जास्त पेट्रोल येते, कारण तिथे पेट्रोलची किंमत 249.80 रुपये आहे, तर एक लिटर डिझेल एक डॉलरलाही मिळते.
आता भारतातल्या किंमती पाहिल्या तर मुंबईत १०६ रुपये प्रति लीटर पेट्रोल मिळते, तर डिझेल ९४ रुपयांना मिळते. दिल्लीत पेट्रोल ९७ रुपये आणि डिझेल 90 रुपयांना आहे. या दरांचा जर विचार केला डॉलर 81.53 रुपयांना आहे. एका डॉलरमध्ये एक लीटर पेट्रोलच काय तर डिझेलही खरेदी करता येणार नाही. पण पाकिस्तानात ते शक्य आहे.
मुंबईत एक लीटर पेट्रोलसाठी तुम्हाला पाकिस्तानपेक्षा २५ रुपये आणि दिल्लीत २० रुपये जास्त खर्च करावे लागत आहेत. पाकिस्तानात पेट्रोल लीटरपेक्षा जास्त येतेय. डिझेल भारतात खरेदी करायचे झाल्यास दिल्लीत आठ रुपये अधिक मोजावे लागतील तर मुंबईत १५ रुपये जादा मोजावे लागत आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील पेट्रोलच्या किमतीतील तफावत एवढी कशी तर त्यामागे केंद्र आणि राज्यांचा वेगवेगळा कर हा प्रमुख कारण आहे. भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे गणित पाहिल्यास राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची मूळ किंमत ५७.१३ रुपये आहे. यावर 19.90 रुपये उत्पादन शुल्क, 15.71 रुपये व्हॅट आणि 3.78 रुपये डीलर कमिशन लागू आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर 96.72 रुपयांवर पोहोचला आहे.
डिझेलची मूळ किंमत 57.92 रुपये प्रति लिटर आहे. यावर 15.80 रुपये केंद्र उत्पादन शुल्क आणि 13.11 रुपये व्हॅट आकारला जातो. याशिवाय, प्रति लीटर 2.57 रुपये डीलर कमिशन देखील आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये झाली आहे. हेच दर राज्यांनुसार बदलत आहेत.