Pay 2 lakh and bring home a 7 seater 'Kia Carens' car; Know how much will be EMI per month?
२ लाख भरा अन् ७ सीटर 'Kia Carens' कार घरी आणा; जाणून घ्या किती असेल दरमहा EMI? By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 12:02 PM2023-10-24T12:02:13+5:302023-10-24T12:09:53+5:30Join usJoin usNext Kia Motors भारतीय बाजारपेठेत SUV आणि MPV सेक्टरमध्ये अनेक वाहन विक्री करते. MPV सेगमेंटमध्ये, Kia च्या बजेट ७ सीटर कार Carens ने पूर्णपणे मार्केट काबीज केले आहे आणि दर महिन्याला तिची चांगली विक्री होत आहे. मारुती एर्टिगा या भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्या MPV ला टक्कर देणारी ही कार लूक आणि फीचर्स तसेच मायलेजच्या बाबतीत जबरदस्त आहे. इलेक्ट्रॉनिक सनरुफ आणि ड्रायव्हिंग मोडशी लिंक्ड ॲम्बियंट लायटिंह सारखे जबरदस्त फीचर मिळेल. तुम्हालाही या सणासुदीच्या हंगामात Kia कार खरेदी करायची असेल आणि एकरकमी पैसे देण्याऐवजी एक चांगला पर्याय म्हणून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्याच्या बेस मॉडेलवर उपलब्ध कर्जासह EMI आणि व्याजदराशी संबंधित सर्व माहिती देऊ. Kia Carens भारतीय बाजारपेठेत प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी, लक्झरी ऑप्शनल आणि लक्झरी प्लस यासारख्या ट्रिम स्तरांवर २३ व्हेरिएंटमध्ये विकली जाते आणि त्यांच्या एक्स-शोरूम किमती रु. १०.४५ लाख ते रु. १९.४५ लाखांपर्यंत आहेत. Kia Carens पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह ८ सिंगल टोन कलर पर्यायांमध्ये विकले जाते. या MPV चे मायलेज २१ Kmpl पर्यंत आहे. Kia Carens केवळ दिसायलाच चांगली नाही, तर तिची वैशिष्ट्ये देखील इतर Kia वाहनांप्रमाणेच अप्रतिम आहेत. यात आतील जागाही भरपूर आहे. Kia Carens च्या बेस मॉडेल Carens प्रीमियम पेट्रोलची एक्स-शोरूम किंमत १०.४५ लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत १२,१०,६५२ रुपये आहे. किया कॅरेन्स केवळ 7 सीटर कॉन्फिगरेशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत लक्झरी ऑप्शनसह येते. तुम्ही Kia Carens च्या या सर्वात स्वस्त व्हेरिएंटला २ लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह कर्ज घेतल्यास तुम्हाला १०,१०,६५२ लाख रुपयांचे कर्ज मिळेल. जर तुम्ही या MPV वर ५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेतले आणि बँकेचा व्याज दर ९ टक्के असेल कर्ज घेतल्यास तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी दरमहा २०,९७९ रुपये EMI म्हणून भरावे लागतील. Kia कारच्या प्रीमियम पेट्रोल व्हेरिएंटला कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सुमारे २.५ लाख रुपये व्याज द्यावे लागतील. किया कॅरेन्सला तीन इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल (115PS/114Nm), 1.4 लिटर टर्बो पेट्रोल (140PS/242Nm) आणि 1.5 लिटर डिझेल (115PS/250Nm) असे आहेत. एमपीव्हीला इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड देण्यात आले आहेत. किया कॅरेन्समध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यांसारखे फीचर्स वैशिष्ट्ये देखील आहेत. एअर प्युरिफायर आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप यासरखे फीचर्स देण्यात आले आहेतटॅग्स :किया मोटर्सKia Motars Cars