6000 रुपये द्या आणि घरी न्या TVS ची जबरदस्त मायलेज देणारी बाईक; पाहा किती पडेल EMI

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 03:44 PM2022-03-04T15:44:07+5:302022-03-04T15:48:56+5:30

Cheap Bike to Buy : या बाईकचे मायलेज 79.3 kmpl इतकं आहे.

जर तुम्ही कमी किंमत असलेली आणि जबरदस्त मायलेज देणारी बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी TVS Radeon हा एक चांगला पर्याय असू शकतो. TVS Radeon ही भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी मोटरसायकल आहे.

जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर केवळ सहा हजार रुपयांचं डाऊनपेमेंट करून ही बाईक घरी नेता येणार आहे. य तुम्हाला किती EMI द्यावा लागेल याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ. यासोबतच आम्ही तुम्हाला या बातमीत या मोटरसायकलची किंमत, मायलेज आणि फीचर्सची माहिती देणार आहोत.

Radeon च्या काही फीचर्सबाबत सांगायचं झालं तर त्यात LED DRL, USB चार्जिंग पोर्ट, डिस्क ब्रेक इत्यादी सामील आहे. BS 6 स्टँडर्ड TVS Radeon मध्ये 109.7 cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इजिन देण्यात आलं आहे.

हे इंजिन 7350 RPM वर 8.08 Ps ची पॉवर आणि 4500 RPM वर 8.7Nm चा टॉर्क जनरेट करत. ट्रान्समिशन पर्यायात 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलाय.

ही बाईक Honda CD 110 Dream DX, Bajaj Platina ES 100 आणि Hero Splendor Plus सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते. या बाईकचे मायलेज 79.3 kmpl इतकं आहे.

TVS Radeon बेस एडिशन BS6 ची किंमत 69233 रुपये आहे. तुम्ही 6000 रुपयांचं डाऊनपेमेंट करूनदेखील ही बाईक खरेदी करू शकता. याशिवाय Bike Dekho EMI कॅल्क्युलेटरनुसार तुमचा 3 वर्षांसाठी 8 टक्के व्याजासह 1,981 रुपये असेल. तुम्हाला 3 वर्षात 8,083 रुपये व्याज द्यावे लागेल.

TVS Radeon वर मिळणारे कर्ज, डाउन पेमेंट आणि व्याजदर देखील तुमच्या बँकिंग आणि CIBIL स्कोअरवर अवलंबून असतात. तुमचं बँकिंग किंवा CIBIL स्कोअर निगेटिव्ह दिसल्यास बँक यात आपल्यानुसार बदल करू शकते. बँकेनुसार यावर आकारले जाणारे व्याज बदलू शकते.