Petrol Vs Diesel car : पेट्रोल कार की डिझेल कार? 80% ग्राहक अजूनही कन्फ्यूज; अशी करा आपल्या ड्रीम कारची निवड... By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 03:32 PM 2023-04-04T15:32:31+5:30 2023-04-04T15:36:31+5:30
Petrol Vs Diesel car : भारतात सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. पण, बहुतेक लोक अजूनही पेट्रोल किंवा डिझेल कार घेण्यास प्राधान्य देतात. Petrol Vs Diesel car : सध्या भारतात सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक कारची (Electrick Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. पण, बहुतेक लोक अजूनही पेट्रोल (Petrol) किंवा डिझेल (Diesel) कार घेण्यास प्राधान्य देतात.
नवीन कार घेणारे बरेच लोक पेट्रोल किंवा डिझेल कार घेण्याबाबत संभ्रमात असतात. याचे कारण म्हणझे, या दोन्ही इंधन पर्यायांमध्ये अनेक वाहने आहेत. काहींना वाटते की, पेट्रोल कार अधिक चांगल्या आहेत, तर काहींना वाटते की डिझेल कार अधिक शक्तिशाली आहेत.
पूर्वी डिझेल वाहने घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे मायलेज जास्त होते आणि इंजिनही मजबूत असायचे. पण आता पेट्रोल इंजिनही खूप अपडेट झाले आहेत.
आता हे इंजिन अधिक रिफाइंड झाले आहेत. तसेच पेट्रोल इंजिनचे मायलेजही खूप वाढले आहे. पूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठी तफावत होती, मात्र आता हा फरक फक्त 10 रुपयांचा झाला आहे. अशा परिस्थितीत डिझेल कार घ्यायची की पेट्रोल कार घ्यायची, असा प्रश्न पडतो.
डिझेल गाड्या कोणी घ्याव्यात?- अनेक वाहन तज्ञांचे असे मत आहे की, जर तुमचा रोजचा प्रवास 50 ते 60 किमी म्हणजेच एका महिन्यात सुमारे 1500 किमी असेल, तर तुम्ही पेट्रोल कार खरेदी करावी. जर तुमचा रोजचा प्रवास 70 ते 100 किमी म्हणजे एका महिन्यात 3000 किमी असेल तर तुम्ही डिझेल कार निवडावी.
तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल कारपेक्षा डिझेल कारचा मेंटेनन्स जास्त असतो. पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारचे आयुष्य 5 वर्षे कमी आहे. राजधानी दिल्लीत 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल कारवर बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, दिल्लीत पेट्रोल कारसाठी 15 वर्षांपर्यंतची मर्यादा आहे. दरम्यान, आजकाल पेट्रोलच्या गाड्याही डिझेलच्या बरोबरीने मायलेज देऊ लागल्या आहेत. मात्र, आताही लिटरमागे 4 ते 5 किलोमीटरचा फरक आहे.
किंमतीत फरक- तिसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारची किंमतही खूप जास्त आहे. जर आपण Hyundai Venue चे उदाहरण घेतले तर त्याच्या पेट्रोल S मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.90 लाख रुपये आहे.
तर व्हेन्यूच्या एस प्लस डिझेल मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.40 लाख रुपये आहे. इतर वाहनांमध्ये ही किंमत कमी-अधिक असू शकते. या माहितीवरुन तुम्ही पेट्रोल कार घ्यायची, की डिझेल कार घ्यायची, हे ठरवू शकता.