कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या 5 कार जानेवारीमध्ये होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 02:10 PM2022-11-28T14:10:20+5:302022-11-28T14:22:57+5:30

वाहन उद्योगासाठी 2022 हे वर्ष खूपच चांगले राहिले आहे. अनेक नवीन कार बाजारात आल्या असून कारची विक्रीही चांगली झाली.

वाहन उद्योगासाठी 2022 हे वर्ष खूपच चांगले राहिले आहे. अनेक नवीन कार बाजारात आल्या असून कारची विक्रीही चांगली झाली. आता 1 महिन्यानंतर नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्षात अनेक नवीन कार बाजारात येणार आहेत. जानेवारी 2023 मध्‍ये 5 नव्या कार लॉन्‍च होणार आहेत.

यामध्ये टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, महिंद्रा XUV400, मारुती बलेना क्रॉस, MG हेक्टर आणि Citroën C3 EV यांचा समावेश आहे.

TOYOTA INNOVA HYCROSS नुकतीच सादर करण्यात आली आहे. हे दोन इंजिन पर्यायांसह येणार आहे. 2.0L NA पेट्रोल आणि 2.0L पेट्रोल (हायब्रिड). हे जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होणार आहे. या कारचे मायलेज 21.1kmpl पर्यंत असेल.

MAHINDRA XUV400 ही कार सप्टेंबर 2022 मध्ये सादर करण्यात आली होती आणि जानेवारी 2023 मध्ये लॉन्च होणार आहे. XUV300 कॉम्पॅक्ट SUV वर आधारित आहे. यात 39.4kWh चा बॅटरी पॅक मिळेल.

MARUTI SUV कारची चाचणी करत आहे, याचे नाव BALENO CROSS असू शकते. सध्या, त्याचे सांकेतिक नाव YTB आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये हे सादर केले जाऊ शकते.

नवीन एमजी हेक्टर फेसलिफ्ट 5 जानेवारीला लॉन्च केली जाऊ शकते. या कारमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी 14-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध असेल.

CITROEN C3 EV देखील जानेवारीमध्ये लॉन्च केला जाऊ शकते. हे C3 हॅचबॅकवर आधारित असेल. त्याची किंमत 10 लाख ते 15 लाख रुपये असू शकते.

टॅग्स :कारcar