Royal Enfield: जबरदस्त अन् दमदार! लवकरच लॉन्च होणार 'या' पाच धमाल बाईक्स, रॉयल एनफील्डही रांगेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:42 PM2022-06-20T12:42:06+5:302022-06-20T12:48:32+5:30

Royal enfield: भारतीय मोटारसायकल बाजारात या वर्षात अनेक दमदार बाइक लॉन्च होण्यास सज्ज आहेत.

भारतीय मोटारसायकल बाजारात २०२२ या वर्षात नेमक्या कोणकोणत्या बाइक लॉन्च होणार आहेत याची उत्सुकता प्रचंड आहे. यातील महत्वाच्या पाच बाइक्सची माहिती आपण जाणून घेऊयात...

भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्री कोरोनानंतर हळूहळू रुळावर येत आहे. बाजारात जम बसवण्यासाठी विविध कंपन्यांकडून वेगवेगळे हातखंडे आजमावले जात आहेत. ऑगस्ट महिन्यापर्यंत दुचाकीच्या बाजारात पाच दमदार बाइक लॉन्च होणार आहेत.

BMW Motorrad जुलै महिन्यात भारतात एक नवी 310cc स्पोर्ट्सबाइक लॉन्च करण्याचा इरादा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही बाइक टीवीएस अपाचे (TVS Apache RR310) या स्पोर्ट्स बाइकला टक्कर देण्यासाठी BMW नवी बाइक लॉन्च करणार आहे.

नव्या Bjaj Pulsar चा लूक देखील समोर आला आहे. या एडिशनचं नाव Eclips Edition असं दिलं जाणार असल्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बजाज पल्सर एन २५० चं ब्लॅक एडिशनवरच आधारित असेल. पुढील महिन्यात नवं व्हर्जन लॉन्च होण्याची शक्यता आहे.

TVS कंपनी ६ जुलै रोजी आपली नवी बाइक बाजारात दाखल करण्यासाठी सज्ज झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार Auto Expo 2018 मध्ये दिसलेल्या Zeppelin कॉन्सेप्ट व्हर्जनमध्ये नवी बाइक असण्याची शक्यता आहे. TVS Zeppelin ब्रँडच्या लाइनअपमध्ये ही पहिलीच क्रूझर ठरणार आहे.

कावासाकी (Kawasaki Versys 650) कडून अपडेटेड 2022 Versys 650 लवकरच भारतात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस नवी बाइक लॉन्च होईल.

रॉयल एनफील्ड हंटर ३५० ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. ३५० आणि क्लासिक ३५० सारखीच नव्या बाइकमध्ये 349cc एअर ऑइल कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिनसह उपलब्ध होणार आहे. यात ५ स्पीड गिअरबॉक्स असणार आहे.