गिअर बदलण्याच्या त्रासापासून सुटक; हे आहेत 5 बेस्ट ऑटो गिअर कार ऑप्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:32 PM2022-02-18T12:32:07+5:302022-02-18T12:38:04+5:30

आम्ही तुम्हाला अशाच काही कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह परवडणाऱ्या किमतीत येतात.

कारमधील गीअर्सचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु सुरुवातीच्या टप्प्यात, कार शिकणाऱ्यांना गिअर बदलताना अनेक त्रास होतो. अचानक गाडी बंद पडते, किंवा कंट्रोल करता येत नाही. अनेकांना या गिअर्स बदलण्याच्या त्रासातून मुक्ती हवी आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही कारबद्दल सांगणार आहोत, ज्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात.

Datsun rediGo- या कंपनीच्या कार्स भारतात जास्त प्रचलीत नाहीत. आपल्यापैकी अनेकांना या कंपनीबद्दल किंवा या कंपनीच्या कार्सबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळेच याची लोकप्रियताही कमी आहे. पण, ही कार AMT 1.0 T पर्यायामध्ये आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या या कारची एक्स-शोरूम किंमत 5 लाखांपेक्षा कमी आहे.

Renault Kwid- हे कंपनीचे एक यशस्वी मॉडेल आहे. भारतातील शहरी रस्त्यांवर अनेकदा हे मॉडेल तुम्ही पाहिले असेल. यात पाच-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे. या मॉडेलचे नाव Kwid RXL ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.

Hyundai Santro- ही कारदेखील AMT गिअरबॉक्स प्रकारात प्रचलीत आहे. यात 1.1 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 69 एचपी पॉवर देऊ शकते. याच्या मॉडेलचे नाव मॅग्ना एएमटी असून, त्याची किंमत सुमारे 5.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर एस्टा मॉडेलची किंमत 6.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Maruti Suzuki S-Presso- या कारमध्ये AMT पर्याय मिळतो. S-Presso VXI AT ची किंमत 5.05 लाख रुपये (एक्स शो रूम) पासून सुरू होते. या कारमध्ये 1.0 लीटर इंजिन आहे, जे 68 एचपीची पॉवर देते.

Maruti Suzuki WagonR- ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. ही कार AMT युनिटमध्येही उपलब्ध आहे. याच्या ऑटोमॅटिक गिअरशिफ्ट व्हेरियंटची किंमत सुमारे 6 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.