renault kiger from price to specifications here know everything about this sub compact suv
मारुती ब्रेझा, किया सोनेट, टाटा nexon ला कडवी टक्कर; 5.45 लाखांत कॉम्पॅक्ट SUV लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:57 PM2021-02-16T12:57:52+5:302021-02-16T13:12:36+5:30Join usJoin usNext Renault ने आपली नवी सब 4 सीटर कॉम्पॅक्ट SUV Kiger सोमवारी भारतात कमर्शिअली लाँच केली. कंपनीनं ही कार पेट्रोल इंजिन या पर्यायतच बाजारात आणली आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुरूवातीची किंमत 5.45 लाख रूपये (एक्सशोरुम) आहे. कंपनीनं २८ जानेवारी रोजी भारतात ही SUV Kiger प्रदर्शित केली होती. Kiger ही SUV पहिल्यांदा नोव्हेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा जगासमोर आणली होती. Renault Kiger च्या बुकिंगलाही सुरूवात करण्यात आली आहे. केवळ ११ हजार रूपयांचं टोकन अमाऊंट देऊन कंपनीच्या डिलरशीप आऊटलेट अथवा रेनो इंडियाच्या वेबसाईटवरून Renault Kiger चं बुकिंग करता येऊ शकतं. Renault Kiger ही एसयूव्ही फ्रान्स आणि भारतातील कॉर्पोरेट डिझाईन टीमनं मिळून तयार केली आहे. Renault Kiger ही ग्रुप रेनोची तिसरी ग्लोबल कार आहे, जी सर्वप्रथम भारतात लाँच केली जाईल. कंपनीनं Renault Kiger चं उत्पादन चेन्नईतील आपल्या उत्पादन प्रकल्पात सुरू केलं आहे. Renault Kiger ही एसयूव्ही कॅस्पियन ब्लू, रेडिअंट रेड, मूनलाईट सिल्व्हर, प्लॅनेट ग्रे, आईसकुल व्हाईट आणि माहोगनी ब्राऊन या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना सर्ल व्हेरिअंटवर ड्युअल डोन कलर ऑप्शनसाठी १७ हजार रूपये अधिक द्यावे लागतील. Kiger CMFA+ प्लॅटफॉर्म वर बेस्ड आहे जो Triber मध्ये वापरण्यात आला आहे. Kiger ची भारतीय बाजारात Maruti Suzuki Vitara Brezza, Nissan Magnite, Toyota Urban Cruiser, Mahindra XUV 300, Tata Nexon, Kia Sonet, Hyundai Venue आणि Ford EcoSport या कार्सशी टक्कर असेल. Kiger मध्ये 8 इंचाचा वायरलेस टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलं आहे. तो अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त वायरलेस स्मार्टफोन चार्जर, पीएम 2.5 क्लिन एअर फिल्टर, 7 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, फ्लोटिंग रूफटॉप, ARKAMYS 3डी साऊंड सिस्टम, स्टियरिंग माउंटेड कंट्रोल्स, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटन म्हणजेच कि-लेस अॅक्सेस, व्हॉईस रेकग्नायझेशन आणि क्रुझ कंट्रोलसारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. Kiger मध्ये इन-केबिन स्टोरेज स्पेस 29.1 लिटरपर्यंत आहे. तसंच बूट स्पेस 405 लिटर आहे. दुसऱ्या लाईनमधील सीट मागेकरून ती 879 लिटरपर्यंत वाढवता येऊ शकते. यामध्ये दोन फ्रंट सीच आणि दोन रिअर साईड सीट आहेत. यामध्ये पुढे आणि मागे सीट बेल्ट देण्यात आले आहेत. तसंच फ्रन्ट सीटमध्ये सीट बेल्ट रिमांडरही देण्यात आला आहे. Renault Kiger मध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.0 लिटर आणि 1.0 लिटर टर्बो इंजिन देण्यात आले आहेत. हे इंजिन 3,500rpm वर 70bhp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एक एएमटी ऑप्शनही आहे. तर 1.0 लिटर टर्बो इंजिन 97 hp पॉवर देतो. मॅन्युअल ट्रान्समिशनवर हा 160 Nm टॉर्क देतो आणि ऑप्शनल सिव्हीटी मॉडेल 157 Nm टॉर्क देण्यात सक्षम आहे. Renault Kiger मध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स ड्राईव्ह मोड देण्यात आले आहेत. Renault Kiger मध्ये डिझेल इंजिनचा पर्यायही देण्यात आलेला नाही. Renault Kiger मध्ये 205 mm ग्राऊंड क्लिअरन्स, क्रोम फ्रन्ट ग्रिल, LED DRLs, प्योर व्हिजन LED हेडलँप्स, स्किड प्लेट, C शेप सिग्नेचर टेल लँप्स, डायमंड कट अलॉय व्हिल्स, स्पोर्टी रिअर स्पॉईलरसारखे फिचर्स आहेत. टॅग्स :रेनॉल्टमारुती सुझुकीकिया मोटर्सटाटाRenaultMaruti SuzukiKia Motars CarsTata