रेनॉल्ट क्विड नव्या अवतारात लाँच; किंमत 2.83 लाखांपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 11:42 AM2019-10-02T11:42:27+5:302019-10-02T11:47:19+5:30

रेनॉल्टने भारतातील सर्वाधिक खपाची Renault Kwid नव्या अवतारात लाँच केली आहे. या छोट्या कारची किंमत 2.83 लाख रुपये ठेवण्यात आली असून जुन्या मॉडेलपेक्षा 20 हजारांनी जास्त आहे.

Renault Kwid चे पाच व्हेरिअंट बाजारात आले आहेत. Standard, RxE, RxL, RxT (O) आणि क्लायमबर असे हे व्हेरिअंट आहेत. नवीन क्विडही दोन पेट्रोल इंजिनांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहेत. फेसलिफ्ट क्विडची बुकिंगही सुरू झाली आहे. 5 हजार रुपयांत कंपनीच्या वेबसाईटवर ही कार बुक करता येणार आहे.

क्विडची स्टायलिंग रेनॉची इलेक्ट्रीक कार City KX-E वरून घेण्यात आली आहे. यामध्ये एमजी हेक्टर आणि टाटा हॅरिअर या एसयुव्हीसारखे स्प्लिट हेडलँप देण्यात आले आहेत. एलईडी डीआरएलही देण्यात आले आहेत. तर मुख्य हेललँप बंपरमध्ये देण्यात आले आहेत. जुन्या मॉडेलमध्ये हनीकोम्ब पॅटर्न ग्रील होती. नव्या क्लिडमध्ये ट्रिपल स्लैट्स ग्रील देण्यात आली आहे. बंपरही नवीन डिझाईनमध्ये देण्यात आला आहे.

क्विडच्या मागच्या बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवीन लाईट रिफ्लेक्टर आणि टेल लाईटमध्ये एलईडी बल्ब देण्यात आले आहेत. कामच्या टॉप व्हेरिअंट क्लायम्बरमध्ये पुढे आणि मागे फॉक्स स्किड प्लेट्स, रुफ रेल्स, गनमेट ग्रे अलॉय व्हील्स आणि ऑरेंज हायलाईट्स मिळणार आहेत.

क्विडच्या डॅशबोर्डची डिझाईनमध्येही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि नवीन स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे. इन्फोटेनमेंट सिस्टीम ट्रायबरची घेण्यात आली आहे. अन्य बाबीही ट्रायबरसारख्याच आहेत. नवीन सीट फॅब्रिकसोबत डोअर पॅडमध्येही बदल करण्यात आले आहेत.

नव्या क्विडमध्ये बाहेरूनच बदल करण्यात आले आहेत. मात्र, इंजिन गिअरबॉक्स जुन्या कारचेच देण्यात आले आहेत.

0.8 लीटरचे आणि 1.0 लीटर असे दोन इंजिन देण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे हे दोन्ही इंजिन बीएस4 एमिशन नॉर्म्समध्ये मोडणारे आहेत.