२० हजार रुपये देऊन घरी आणा Revolt RV400 ई-बाईक; महिन्याला किती EMI भरावा लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:03 PM2022-12-24T12:03:10+5:302022-12-24T12:04:42+5:30

भारतातील इलेक्ट्रिक बाइक प्रेमींच्या गरजा लक्षात घेऊन, Revolt Motors ने Revolt RV400 नावाची एक जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. जी चांगली लूक आणि वैशिष्ट्ये तसेच उत्तम बॅटरी रेंज आणि स्पीडनं सुसज्ज आहे.

जर तुम्ही नवीन वर्षात स्वत:साठी इलेक्ट्रिक बाईक शोधत असाल आणि एकरकमी पैसे देण्याऐवजी फायनान्स करू इच्छित असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त २०००० रुपये डाऊनपेमेंट करून रिव्हॉल्ट RV400 घरी आणू शकता.

उर्वरित रकमेसाठी कर्ज घेतल्यावर या इलेक्ट्रिक बाईकसाठी तुम्हाला किती टू व्हिलर लोन घ्यायचे आहे आणि किती व्याजदरावर, ३ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी किती हप्ते तुम्हाला भरावे लागतील याची सर्व माहिती जाणून घेऊया.

Revolt RV 400 ची भारतातील ऑन-रोड किंमत रु.१,३५,५०३ लाख आहे. ही सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल 3.24 KWh क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाते जी 72 V पॉवर जनरेट करू शकते आणि एका चार्जवर १५० किमीपर्यंत धावू शकते.

Revolt RV400 चा टॉप स्पीड 85 kmph पर्यंत आहे. Revolt RV400 ला पूर्ण चार्ज होण्यासाठी ४.५ तास लागतात. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये एलईडी हेडलाइट, फुल एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 4जी कनेक्टिव्हिटी, ट्रॅव्हल हिस्ट्री, बॅटरी हेल्थ, जिओ फेन्सिंग आणि रिमोट कंट्रोल यासह अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

किती कर्ज आणि किती EMI? जर तुम्ही २०,००० रुपये डाउनपेमेंट करून रिव्हॉल्ट RV400 साठी कर्ज घेतल्यास तुम्हाला १,१५,५०३ रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर व्याज दर ९% असेल आणि कर्ज ३ वर्षांसाठी उपलब्ध असेल

तुम्हाला हे कर्ज फेडण्यासाठी पुढील ३६ महिन्यांसाठी ३,६७३ रुपये EMI, म्हणजे मासिक हप्ता म्हणून भरावे लागतील. रिव्हॉल्ट RV400 इलेक्ट्रिक बाईकसाठी तुम्ही कर्ज घेतले तर तुम्हाला सुमारे १७००० रुपये व्याज द्यावे लागेल.