Nitin Gadkari: 2022 पर्यंत अशा कार येतील, ज्या पेट्रोलवर लीटरमागे 20 रुपये वाचवतील; नितीन गडकरींचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 08:01 PM2021-08-04T20:01:48+5:302021-08-04T20:07:05+5:30

Cars can save money on Petrol, using Ethanol: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री (MORTH) नितीन गडकरी यांनी मंगळवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली.

देशात पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी आकाश गाठले आहे. यामुळे गाडीचा हप्ता भरायचा की इंधनावर भरमसाठ खर्च करायचा अशा मनस्थितीत वाहन चालक आहेत. इंधनाचा खर्च जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे केंद्र सरकारने म्हणजेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कंपन्यांना (Nitin Gadkari) अशा गाड्या बनविण्यास सांगितले आहे, ज्या इंधनाचा खर्च 20 टक्क्यांनी कमी करू शकतात. (Nitin Gadkari ask SIAM meeting to Produce Flex-Fuel vehicals from next year.)

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री (MORTH) नितीन गडकरी यांनी मंगळवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली.

यामध्ये नितीन गडकरींनी फ्लेक्स फ्युअल (Flex-Fuel) वर चालणाऱ्या गाड्यांचे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

Flex-Fuel Vehicle (FFV) मध्ये असे इंजिन असते जे एकापेक्षा जास्त ईंधनावर चालू शकते. या गाड्या ज्या प्रकारे 100 टक्के पेट्रोलवर चालू शकतात तशाच त्या 100 टक्के इथेनॉलवर देखील चालू शकतात.

नितीन गडकरी यांनी कंपन्यांनी लवकरात लवकर या फ्लेक्स फ्युअलच्या गाड्या बाजारात आणण्याच्या सूचना केल्या.

अशा प्रकारच्या गाड्या एका वर्षाच्या आत बाजारात उतरवाव्यात, असे गडकरी म्हणाले. यामुळे या गाड्या पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे.

बैठकी दरम्यान नितीन गडकरी यांनी सांगितले की, Flex-Fuel गाड्यांचे तंत्रज्ञान आधीपासूनच उपलब्ध आहे. अमेरिका, ब्राझीलमध्ये याचे यशस्वी उत्पादन घेतले जाते. तिथे भारतात असलेल्या काही कंपन्यांतच्या गाड्या इथेनॉल आणि गॅसोलिनवर चालू शकतात.

फ्लेक्स गाड्यांबाबत नितीन गडकरींनी संसदेतही वक्तव्य केले होते. परंतू कंपन्यांना थेट आदेश देण्यात आले नव्हते. आता गडकरींनी सियामच्या पदाधिकारी म्हणजेच कंपन्यांचे सदस्य असलेल्या अधिकाऱ्यांना थेट सूचना केल्या आहेत.

देशात इथेनॉलची किंमत 60 ते 62 रुपये आहे. यामुळे उत्पादन वाढले तर त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते. यामुळे लोकांचा इंधनावरील खर्चदेखील कमी होईल असे गडकरी संसदेत म्हणाले होते.

जर पेट्रोलच्या जागी इथेनॉलचा वापर होऊ लागला तर पेट्रोलवरील खर्च कमी होईल. किंमतीसोबत कॅलोरिक व्हॅल्यूदेखील इथेनॉलमध्ये कमी असते. एक लीटर इथेनॉल जवळपास 750 ते 800 मिली पेट्रोल एवढे असते.

अशावेळी जर पेट्रोलची किंमत 100 रुपये धरली तर इथेनॉलच्या वापराने पेट्रोलच्या प्रत्येक लीटरमागे 20 ते 30 रुपये वाचणार आहेत. (Union Road Transport And Highways Minister Nitin Gadkari On Tuesday Emphasised The Need For A Quick Roll-Out Of 'Flex-Fuel Vehicles Within A Year's Time.)