Rolls-Royce Boat Tail, the most expensive car in the world, See Photo
Photo : जगातील सर्वात महागड्या कारचे लाँचिंग; एवढ्या किंमतीत उभा राहिलाय शाहरुख खानचा 'मन्नत'! By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:44 PM2021-05-28T17:44:49+5:302021-05-28T17:47:56+5:30Join usJoin usNext लग्झरी कार तयार करणाऱ्या प्रसिद्ध कंपनी रॉल्स रॉयस यांनी जगातील सर्वात महागडी कार लाँच केली. बोट टेल असे या कारचे नाव असून त्याची किंमत २० मिलियन पाऊंड्स म्हणजेत जवळपास २०६ कोटी इतही आहे. चार वर्षांच्या मेहनतीनंतर रॉल्स रॉयसनं ही कार तयार केली आहे. रॉल्स रॉयस बोट टेल चार सीटरची लग्झरी कार आहे आणि ती १९ फूट लांब आहे. एन कोचबिल्ड प्रोग्राम अंतर्गत रॉल्स रॉयसनं तयार केलेली ही पहिली लग्झरी कार आहे. ही कार रॉल्स रॉयसच्या स्वेप टेल कारच्या प्रेरणेतून तयार केली गेली आहे. बोट टेलपूर्वी स्वेप टेल हीच रॉल्स रॉयसची सर्वात महागडी गाडी होती. रॉल्स रॉयसनं २०१७मध्ये स्वेप टेल लाँच केली होती आणि तिची किंमत १३० कोटी इतकी होती. या कारचा फक्त एकच मॉडल लाँच झाला. युरोपियन व्यक्तिनं ती कार खरेजी केली. रिपोर्टनुसार बोट टेल कारचे तीन मॉडल लाँच केले गेले आहेत. बोट टेल कारचा मागचा भाग हा लग्झरी स्पीडबोटसारखा आहे. रॉल्स रॉयसचे CEO टॉर्सटन मुलर यांनी सांगितले की, पिकनिकसाठी गरजेच्या असलेल्या सर्वा सुविधा लक्षात ठेऊन ही कार तयार केली गेली आहे आणि यापेक्षा चांगलं पॅकेज कुठल्याच कारमध्ये मिळणार नाही. या कारमध्ये १५ स्पीकरचा सराऊंड साऊंट सिस्टम आहे. या कारसाठी स्वित्झर्लंडच्या प्रसिद्ध घड्याळ बनवणाऱ्या कंपनी बोवी १८२२ने विषेश घड्याळ तयार केले आहे. रॉल्स रॉयस कलिनन, फँटम आणि ब्लॅक बैज सारख्या लग्झरी कारमध्ये वापरण्यात आलेलं इंजिन या कारमध्ये आहे. V12 6.75 बाईटर्बो इंजिन ५६३ एचपी पॉवर देण्यास ही कार सक्षम आहे. भारताता काही सेलिब्रेटी या कंपनीच्या कार वापरतात. डायरेक्टर विधू विनोद चोप्रा यांनी बिग बि अमिताभ बच्चन यांना रॉल्स रॉयस फँटम कार गिफ्ट केली होती. टॅग्स :काररोल्स-रॉईसcarRolls-Royce