रोनाल्डोकडून जगातील सर्वात महागड्या कारची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 19:04 IST2019-05-01T19:01:05+5:302019-05-01T19:04:38+5:30

जगभरातल्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने जगातील सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. त्याने बुगाटीला त्याच्या ताफ्यामध्ये सामिल केले आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे जगातल्या महागड्या कार आहेत. त्याने यावेळी बुगाटीची स्पोर्ट कार खरेदी केली आहे. बुगाटी ला वोइतूर नोइर (Bugatti La Voiture Noire) असे या कारचे नाव आहे. बुगाटीनेही या कारसाठी ग्राहक मिळाल्याचे म्हटले आहे. मात्र, रोनाल्डोनेच ती कार खरेदी केल्याचे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.
बुगाटीची ही कार रोनाल्डोकडे 2021 मध्ये येणार आहे. कारण ही कार मागणीनुसार बनविण्यात येते. या कारला जिनिव्हा मोटर शोमध्ये 2019 शोकेस करण्यात आली होती. रोनाल्डो या कारसाठी 11 दशलक्ष युरो खर्च करणार आहेत.
Bugatti La Voiture Noire ची किंमत
बुगाटीच्या या स्पोर्ट्स कारची किंमत तब्बल 9.5 दशलक्ष पाऊंड सांगण्यात येत आहे. भारतीय चलनामध्ये या कारची किंमत 86.5 कोटी रुपये आहे.
बुगाटीच्या या कारचे डिझाईन 1936 आणि 1938 मध्ये बनलेल्या बुगाची टाईप 57 एससी अॅटलांटिक सारखी आहे. Bugatti La Voiture Noire मध्ये 8.0 लीटर टर्बोचार्ज्ड W16 इंजिन आहे जे 260 मैल प्रति तास वेगाने धावते.
100 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त कमाई
फ्रेंच लग्झरी कार कंपनी बुगाटीने केवळ एक प्रोटोटाईप कार बनविली होती. जी 110 व्या वर्धापन दिनादिवशी अर्पित केले होते.
ख्रिस्तिय़ानो रोनाल्डो हा जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 100 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक आहे. यामुळेच त्याने कदाचित ही महागडी कार घेण्याचे ठरविले असेल.