Royal Enfield Classic Recalled: चाहत्यांना जबर धक्का! रॉयल एन्फिल्डनं परत मागवल्या २६,३०० गाड्या; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 10:28 AM2021-12-21T10:28:45+5:302021-12-21T10:35:11+5:30

Royal Enfield Classic Recalled: तुमची बाईक सुद्धा यात आहे का?, पाहा कसं व्हेरिफाय करू शकता.

Royal Enfield Classic Recalled: रॉयल एन्फिल्डकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. रॉयल एन्फिल्डनं आपल्या क्लासिक 350 (Classic 350) या मोटरसायकलच्या 26,300 युनिट्स परत मागवल्या आहेत.

ब्रेक रिअॅक्शनमध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे कंपनीनं या गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतलाय. मोटरसायकलच्या स्विंग आर्मशी निगडित ब्रेक रिअॅक्शन एका स्पेसिफिक रायडिंग कंडिशनमध्ये खराब होऊ शकतो, असं रॉयल एन्फिल्डच्या टेक्निकल टीमला दिसून आलं.

जेव्हा रिअर ब्रेक पेडलवर अधिक ब्रेकिंग लोड लावला जातो तेव्हा रिअॅक्शन ब्रॅकेटला नुकसान होऊ शकतं. यामुळे असामान्य ब्रकिंग नॉईस होऊ शकतं आणि याप्रकारे एक्स्ट्रिम कंडिशनमध्ये ब्रेकिंग कमी होऊ शकतं, तसंच अपघाताचीही भीती असल्याची शक्यता आहे.

ही समस्या सिंगल चॅनल ABS, रिअर ड्रम ब्रेक क्लासिक 350 मॉडेलमधील आहे. याचं उत्पादन 1 सप्टेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान करण्यात आलं होतं. या बाईक्स स्विंग आर्म ब्रेक रिअॅक्शन ब्रॅकेटला ठीक करण्यासाठी परत मागवल्या जात आहेत.

"एक्स्ट्रिम कंडिशन रायडिंगमध्ये अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. ग्रहकांच्या सुरक्षेकडे पाहता हे लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असं कंपनीनं म्हटलंय.

रॉयल एन्फिल्डची सर्व्हिस टीम आणि स्थानिक डीलरशिप अशा ग्राहकांशी संपर्क साधण्यास सुरुवात करतील ज्यांच्या बाईक्स या कालावधीत बनवलेल्या बाइक्सच्या यादीत आहेत. याची माहिती मिळवण्यासाठी क्लासिक 350 मॉडेल धारकांनारॉयल एन्फिल्डच्या वेबसाइट किंवा स्थानिक वर्कशॉपला भेट देऊन याची माहिती घेता येईल.

याशिवाय ग्राहकांना माहिती पडताळण्यासाठी कंपनीच्या हेल्पलाइन नंबर - 1800 210007 वर कॉल देखील करता येणार आहे.

2021 रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आली होती. या बाईकची किंमत 1.84 लाख रुपयांपासून 2.15 लाखांपर्यंत (एक्स-शोरूम) पर्यंत होती.

Meteor 350 असलेल्या जे प्लॅटफॉर्मवरच ही अपडेटेड बाईक तयार करण्यात आली आहे. नव्या क्लासिकमध्ये Meteor 350 चे अनेक कम्पोनंन्ट्स देण्यात आलेत.

ही बाईक रेट्रो क्रूझर यूएसबी चार्जर, रीडिझाइन केलेला टेललाइट, अद्ययावत एक्झॉस्ट पाईप, 13-लिटर इंधन टाकी आणि अधिक आरामदायी राइडिंग अनुभवासाठी अद्ययावत सीटसह सुसज्ज आहे.