Safest Cars: 'या' 10 कार आहेत सर्वात सुरक्षित; तुम्ही आणि तुमची फॅमिली राहणार एकमद सेफ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 08:01 PM2022-10-18T20:01:39+5:302022-10-18T20:05:40+5:30

Safest Cars: या सणासुदीच्या काळात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कारच्या सेफ्टी रेटिंगवर विशेष लक्ष द्या.

Safest Cars: या सणासुदीच्या काळात तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कारच्या सेफ्टी रेटिंगवर विशेष लक्ष द्या. कार जितकी सुरक्षित असेल, तितकीच तुमची फॅमिली सुरक्षित असेल. कुठलीही कार किती सुरक्षित आहे, हे NCAP कडून मिळणाऱ्या रेटिंगवर अवलंबून असते. जर कारला 5 स्टार रेटिंग मिळाली, म्हणजे ती कार सर्वात सुरक्षित आहे.

पण, याचा अर्थ असा नाही की, एखाद्या कारला 4 रेटिंग मिळाली म्हणजे ती कार सुरक्षित नाही. फक्त ती कार, 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळणाऱ्या कारच्या तुलनेत कमी सुरक्षित आहे. विशेष म्हणजे, वयस्कर आणि लहान मुलांसाठी मिळणाऱ्या सेफ्टीसाठी वेगवेगळी रेटिंग आहे. ग्लोबल NCAP ने 32 कार्सची क्रॅश टेस्ट लिस्ट जारी केली आहे. या लिस्टमध्ये फक्त 7 मॉडेल असे आहेत, ज्यांना 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. आम्ही तुम्हाला टॉप-10 लिस्ट दाखवणार आहोत.

ग्लोबल NCAP काय आहे?- ग्लोबल NCAP टुवर्ड्स झिरो फाउंडेशनचा भाग आहे. ही ब्रिटेनमधील चॅरिटी ऑर्गनायझेशन आहे. NCAPकडून जवळपास सर्वच गाड्यांची क्रॅश टेस्ट केली जाते. या टेस्टसाठी कारमध्ये एक डमी(पुतळा) बसवला जातो. हा डमी एकदम माणसाप्रमाणेच असतो. चाचणीदरम्यान गाडीला एका ठराविक वेगाने एखाद्या मजबूत वस्तूवर आदळली जाते.

या चाचणीत 4 ते 5 डमीचा वापर होतो. बॅक सीटवरील चाइल्ड सेफ्टी सीटवर लहान मुलाचा डमीदेखील असतो. क्रॅश टेस्टदरम्यान कारच्या एअर बॅग्सने काम केले की नाही, किती वेळात एअरबॅग उघडली, हे पाहिले जाते. तसेच, अपघातात डमीचे किती नुकसान झाले, कारच्या सेफ्टी फीचर्सने किती काम केले? या सर्व बाबींच्या आधारावर रेटिंग दिली जाते.

ग्लोबल NCAP च्या ऑक्टोबर लिस्टनुसार, 32 पैकी फक्त 7 मॉडेलला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यात फॉक्सवॅगन टायगन, स्कोडा कुशाक, टाटा पंच, महिंद्रा XUV300, टाटा अल्ट्रोज, टाटा नेक्सन आणि महिंद्रा XUV700 सामील आहेत. परंतू, या सर्व कारची अडल्ट आणि चाइल्ड रेटिंग वेगवेगळी आहे. फॉक्सवॅगन टायगन आणि स्कोडा कुशाकला अडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 5-5 स्टार रेटिंग मिळाली आहे. टायगन आणि कुशाकला 83 पैकी 71.64 स्कोअर मिळाला आहे.

ग्लोबल NCAP ने ज्या 32 कार्सना सेफ्टी रेटिंग जारी केली आहे, त्यात 12 मॉडेलला 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यात होंडा, टोयोटा, महिंद्रा, वॉक्सवॅगन, मारुती, टाटा, रेनो, निसानसारख्या कंपन्या आहेत. या कार्समध्येही अडल्ट आणि चाइल्ड ऑक्युपेंटला वेगळी रेटिंग आहे. टॉप-20 मध्ये 3 स्टार सेफ्टी रेटिंग असलेली एकमेव गाडी किआ कारेंस आहे.