Sedan Vs. SUV Cars: सेदान सोडून एसयुव्हींच्या का मागे लागलेत लोक? ही आहेत पॉप्युलर होण्याची कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 04:42 PM2021-12-18T16:42:55+5:302021-12-18T16:48:43+5:30

why SUV cars more Popular than Sedan's: भारतीय बाजारात आता या छोट्या एसयुव्हींचे मार्केट बहरू लागले आहे. या गाड्या का सेदानवर भारी पडू लागल्या आहेत. यामागे काही कारणे आहेत.

नेहमी लोक कार खरेदी करण्याचा प्लॅन करतात तेव्हा ते विचारात पडतात, कोणती कार घेऊ, कोणत्या प्रकारची घेऊ वगैरे. अनेकांना सेदान कार या प्रमिअम दिसत असल्याने त्याच जास्त भावतात आणि लोक त्या कार घेतात. म्हणजे घ्यायचे. पण आता लोकांचा मूड बदलतोय.

जनरेशन जशी कमावू लागली तशी त्यांची आवड बदलू लागली आहे. सेदान, कॉम्पॅक्ट सेदान या कार फॅमिलीसाठी प्रशस्त कार आहेत. कारण त्यात सामान ठेवण्यास जास्त जागा असते आणि लांबच्या प्रवासासाठी देखील आरामदायक असतात, मायलेजही चांगले असते. हे जरी खरे असले तरी आता लोक मिनी एसयुव्ही, कॉम्पॅक्ट एसयुव्हींच्या मागे लागले आहेत.

भारतीय बाजारात आता या छोट्या एसयुव्हींचे मार्केट बहरू लागले आहे. या गाड्या का सेदानवर भारी पडू लागल्या आहेत. यामागे काही कारणे आहेत. कदाचित तुमच्याही मनात यातील एखादे कारण असू शकते किंवा काही वेगळे देखील असू शकते.

भारतीय बाजारात सध्या एसयुव्हीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. म्हणजेच ग्राहकांना एकापेक्षा एक असे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. याचबरोबर डिझाईनमध्ये देखील पर्याय मिळत आहेत. जे सेदान कारमध्ये फारसे दिसत नाहीत.

एसयुव्हीमध्ये बसल्यानंतर कार चालकाला रस्ता पुरेसा म्हणजेच सेदानपेक्षा जास्त दिसतो. कार उंच असल्याने सीटही उंच असते. यामुळे व्हिजिबिलीटी वाढते. सेदानपेक्षा एसयुव्हीमध्ये बसलेला व्यक्ती जास्त सजग असतो. यामुळे रस्ते सुरक्षा असेल किंवा अपघात वाचविण्याची संधी दोन्हीमध्ये एसयुव्ही बाजी मारते.

एसयुव्हींमध्ये ग्राऊंड क्लिअरन्स जास्त असतो. यामुळे ओबड धोबड रस्त्यांवर कमी हिसका देत कार चालते. यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना त्रास होत नाही. उंच पोझिशन आणि जमिनीपासून जास्त अंतर असल्याने गाडी खड्डेमय रस्ते आणि खड्डे चांगल्याप्रकारे दाखविते. स्पीडब्रेकर किंवा दगड असेल तर अंडरबॉडी डॅमेजदेखील होत नाही. साचलेल्या पाण्यातूनही आरामात पार होता येते, जे आता शहरांची देखील मोठी समस्या बनू लागली आहे.

एसयुव्ही सेदानच्या तुलनेत अधिक आरामदायक बनू लागली आहे. कारण यामध्ये बुट स्पेस जास्त असते. लाँग ट्रीप असेल तर प्रवासी आरामात पाय पसरून बसू शकतात.

तुमच्याकडे आधी मारुती 800, अल्टो, ह्युंदाई इऑन, सँट्रो अशा छोट्या कार असतील. त्यानंतर पुन्हा त्याच कार घेणार क्वचित असतात. आपण अपग्रेड करतो. सेलेरियो, ग्रँड आय 10, स्विफ्ट अशा गाड्या घेतो. पुन्हा अपग्रेड. सेदान, कॉम्पॅक्ट सेदान आता तुमच्याकडे पर्याय उरतो तो एसयुव्ही, कॉम्पॅक्ट किंवा मायक्रो एसयुव्ही. काहीजण थेट या सेगमेंटवर देखील येतात. हे देखील एक मुख्य कारण आहे.