'अशी' दिसते Mahindra XUV 700; 5 सेकंदात 60kms चा स्पीड, पाहा किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 09:27 PM2021-08-14T21:27:58+5:302021-08-14T21:41:13+5:30

Mahindra And Mahindra नं आपली मोस्ट अवेटेड एसयूव्ही Mahindra XUV 700 वरून उठवला पडदा. पाहा काय आहे विशेष.

Mahindra and Mahindra नं आपल्या मोस्ट अवेटेड SUV Mahindra XUV 700 वरून अखेर पडदा उठवला आहे. कंपनीनं भारतासह जागतिक बाजारपेठेतही ही कार लाँच केली.

महिंद्रानं या एसयूव्हीमद्ये अनेक सेगमेंट फीचर्स दिले आहेत. यामझ्ये फ्लश डोअर हँडल आणि ऑटो बूस्टर लँप्ससोबत अनेक फीचर्सचा समावेश आहे.

XUV 700 ही कंपनीची पहिलीची SUV आहे जी महिंद्राच्या नव्या Twin Peaked लोगोसह लाँच करण्यात आली आहे. XUV 700 याच वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून बाजारात उपलब्ध होईल.

XUV 700 ही SUV दोन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. याचं mHawk डिझेल इंजिन (मॅन्युअल) 420Nm च्या टॉर्कसह 185PS ची पॉवर जनरेट करेल. तसंच या इंजिनसह येणारं ऑटोमॅटिक व्हेरिअंट 450Nm चा टॉर्क जनरेट करेल.

XUV 700 सोबत मिळणारं दुसरं इंजिन Turbocharged mStallion Gasoline इंजिन आहे. जे 200Ps ची पॉवर आणि 380Nm चा चॉर्क जनरेट करतो.

डिझाईनबाबत सांगायचं झालं तर ही SUV दमदार आणि रोड प्रेझेन्सच्या बाबतीत या सेगमेंटमध्ये बेस्ट आहे. एयूव्हीमध्ये देण्यात आलेले फ्रन्ट ग्रिल या कारला अधिक आकर्षक बनवतात. यामध्ये नव्या डिझाईनचे हेडलँप्स पाहायला मिळतात.

तसंच ते अधिक मोठ्या C शेप DRLs सोबत येतात. तसंच यात पॉप आऊट डोअर हँडल देण्यात आले आहे.

इंटिरिअर बद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये 10.25 इंचाचा ड्युअल स्क्रीन लेआऊट मिळेल. यामध्ये एकाचा वापर इन्फोटेन्मेंटसाठी आणि दुसरा इन्स्ट्रूमेंट क्लस्टरचं काम करेल.

विशेष म्हणजे कंपनी इन्फोटेन्मेंट सिस्टममध्ये ब्रँड न्यू AdrenoX इंटरफेस देत आहे, जो बिल्टइन अॅलेक्सा व्हर्च्युअल असिस्टंटसह येतो.

ट्वीन फाईव्ह स्पोक अलॉय व्हिल्स असलेल्या या कारमध्ये मोठ्या अँग्युलर टेल लाईट्स देण्यात आल्या आहेत. जे या कारला अधिक प्रीमिअम बनवतात.

दमदार साऊंड एक्सपिरिअन्ससाठी यात 12 स्पीकर सेटअप देण्यात आलं आहे. यापैकी एक सबवुफर आहे ज्यात SONY च्या 3D सराऊंडचा आनंद घेता येऊ शकतो.

कनेक्टिव्हीटीसाठी यात अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार प्ले सह वायरलेस चार्जरही देण्यात आला आहे. XUV700 मध्ये कंपनी पॅनोरमिक सनरुफसोबतच ऑटो बूस्टर हेडलाईट्स, ड्युअल झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक पार्किग ब्रेकसारखे फीचर्सही देते.

XUV700 ही SUV सेफ्टीच्या बाबतीतही अॅडव्हान्स्ड आहे. यात कंपनीनं ड्रायव्हर असिस्टंट दिला आहे. तसंच यात फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग फीचरही मिळतं. जे ड्रायव्हर अलर्ट नसेल तर वॉर्निंगही देतं.

जर ड्रायव्हरनं यानंतरही प्रतिसाद दिला नाही, तर ही कार इमर्जन्सी ब्रेकही लावते. याशिवाय यात सात एअरबॅग्स, एबीएसईबीडी, अॅडप्टीव्ह क्रुझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ट्रॅफिक साईन रेकग्नायझेशनसारखे फीचर्सही आहेत.

या कारची भारतातील सुरूवातीच्या MX गॅसोलिन व्हेरिअंटची किंमत 11.99 लाख असून MX Diesel व्हेरिअंटची किंमत 12.49 लाख एक्स शोरूम असेल. तर याच्या AX3 आणि AX5 या गॅसोलिन व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 13.99 लाख आणि 14.99 लाख एक्स शोरूम इतकी असेल.