1947 रूपयांत बुक करा Simple One ची Electric Scooter; 200Km पेक्षाही मिळतेय जास्त रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 03:09 PM2021-08-20T15:09:25+5:302021-08-20T15:43:33+5:30

Simple One Electric Scooter : Simple One च्या इलेक्ट्रीक स्कूटरला ग्राहकांचा मिळतोय मोठा प्रतिसाद. हजारो ग्राहकांनी केली स्कूटर प्री-बुक.

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिंपल वनने (Simple One Electric Scooters) आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली. या कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कूटरला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, बंगळुरूच्या या इलेक्ट्रीक टू व्हिलर बनवणाऱ्या कंपनीनं नुकतीच घोषणा केली, की त्यांच्या या स्कूटरला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तसंच या स्कूटरच्या आतापर्यंत ३० हजार युनिट्स प्री बुक झाल्या असल्याची माहितीही कंपनीनं दिली.

मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी या स्कूटरला पसंती दर्शवली आहे. कंपनीच्या वेबसाईटवरही अनेक लोकांनी भेट दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्कूटर प्री बुक करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने काही समस्या निर्माण झाल्या होत्या. परंतु आता ते सोडवण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं.

सिंपल वन या स्कूटरचं प्री बुकींग कंपनीच्या वेबसाईटवरून केवळ 1947 रूपयांमध्ये करता येत आहे. सध्या बुकिंग सुरू असल्याचंही कंपनीनं सांगितलं आहे.

सिंपल एनर्जीनं देशातील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रीक स्कूटर Simple One भारतीय बाजारपेठेत लाँच केली. कंपनीनं या इलेक्ट्रीक स्कूटरला स्पोर्टी आणि स्टायलिस्ट डिझाईन देण्यसोबतच पॉवरफुल बॅटरी पॅक आणि मोटरचा वापर केला आहे.

या स्कूटरमध्ये 4.8 KWh क्षमतेच्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. तसंच या स्कूटरची मोटर 4.5 KW क्षमतेची पॉवर जनरेट करते.

तसंच ही स्कूटर 2.95 सेकंदात 0 पासून 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग 105 किमी प्रति तास इतका आहे.

110 किमी वजन असलेल्या या स्कूटरमध्ये 30 लिटरची बुट स्पेस (अंडरसीट स्टोरेज) देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्ही एक मोठं हेल्मेटही ठेवू शकता.

सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 236 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीनं केला आहे. या प्रकरणी ही स्कूटर ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला मागे सोडते. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 181 किमी इतकी आहे.

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीनं टचस्क्रीन डिस्प्ले स्मार्ट डॅशबोर्ड दिला आहे. या स्कूटरला तुम्ही अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनही कनेक्ट करू शकता.

यामध्ये रिमोट अॅक्सेस, सिक्युरिटी अॅपसाठी जिओ फेन्सिंग, OTA अपडेट्स, रूट सेव्ह करण्याची सुविधा, रायडिंग स्टॅटिक्स आणि रिमोट लॉकिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

कंपनीनं ही स्कूटर चार रंगांत बाजारात आणली आहे. यामध्ये Brazen Black, Azure White, Brazen White आणि Namma Red हे कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.

अतिशय आकर्षक लूक आणि जबरदस्त इलेक्ट्रीक मोटर असलेल्या या स्कूटरची सुरूवातीची किंमत 1,09,999 रूपये एक्स शोरूम इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच या त्या स्कूटरची किंमत तुलनेनं कमीही ठेवण्यात आली आहे.