Simple One EV: Ola-Ather ची झोप उडणार; तब्बल 236KM रेंज देणारी EV स्कूटर लॉन्च, पाहा फीचर्स... By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 02:36 PM 2023-04-27T14:36:03+5:30 2023-04-27T14:40:09+5:30
नवीन EV घेण्याचा विचार करताय? बंगळुरुमधील कंपनीने बनवली भारतातील सर्वाधिक रेंज असणारी EV स्कूटर. Electric Scooter: सध्या भारतात इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे नवनवीन कंपन्या या क्षेत्रात आपला हात आजमावत आहेत. तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक चांगला पर्याय मिळणार आहे. बंगळुरुमधील स्टार्ट-अप सिंपल एनर्जीने पुढील महिन्यात 23 मे रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल वन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीने 2021 मध्ये पहिल्यांदा आपली स्कूटर दाखवली होती आणि त्यावेळी दावा करण्यात आला होता की, ही देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर असेल. ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची योजना खूप दिवसांपासून सुरू होती आणि त्याबद्दल सतत बातम्या समोर येत होत्या. पण आता कंपनीने अखेर ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे.
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याबाबत सिंपल एनर्जीचे संस्थापक आणि सीईओ सुहास राजकुमार म्हणाले की, जेव्हा आम्ही सिंपल वन तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आमचे उद्दिष्ट ग्राहकांना जागतिक मानकांशी जुळणारे उत्पादन देणे हे होते. आम्ही आमच्या उत्पादनांची चाचणी घेतली आहे. सर्वोत्तम देण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून आम्ही काम करत आहोत.
सिंपल एनर्जी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) 156 रिव्हिजन 3 चे पालन करणारी पहिली कंपनी बनली आहे. हे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या बॅटरीसाठी जास्तीत जास्त सुरक्षिततेची खात्री देते.
कंपनीने सांगितल्याप्रमाणे, सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. या चाचणीदरम्यान अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. सध्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरील डेटानुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 8.5kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर वापरली गेली आहे, जी 72Nm टॉर्क जनरेट करते. यात 4.8kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, जी एका चार्जमध्ये तब्बल 236 किलोमीटरपर्यंतची रेंज देतो.
ड्रायव्हिंग रेंजच्या बाबतीत भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा सिंपल वन उत्तम आहे. ही बाजारात आल्यावर प्रामुख्याने Ola S1 आणि Ather 450X सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा असेल. या दोन्ही स्कूटर अनुक्रमे 181 किमी आणि 146 किमीची रेंज देतात. या इलेक्ट्रिक स्कूटरची कंपनी काय किंमत असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.