कमी 'बजेट'मध्ये स्मार्ट खरेदी; 10 हजारांच्या रेंजमधील टॉप 'स्मार्टफोन' By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 04:07 PM 2023-04-07T16:07:04+5:30 2023-04-07T16:26:05+5:30
स्मार्टफोन घ्यायचा म्हटलं की प्रत्येकालाच वाटते की आपणही आयफोन घ्यावा. ब्रँड आणि हायटेक स्मार्टफोन म्हणून आयफोनचा उल्लेख होतो. मात्र, इच्छा असूनही बजेटमुळे दुसऱ्या कंपनीकडे वळावे लागते. स्मार्टफोन घ्यायचा म्हटलं की प्रत्येकालाच वाटते की आपणही आयफोन घ्यावा. ब्रँड आणि हायटेक स्मार्टफोन म्हणून आयफोनचा उल्लेख होतो. मात्र, इच्छा असूनही बजेटमुळे दुसऱ्या कंपनीकडे वळावे लागते.
स्मार्टफोन घेताना किमान १० हजार रुपयांचे बजेट ठेऊन खरेदी केली जाते. १० हजार रुपयांतही उत्तम फिचर्स आणि दर्जेदार कंपनीचे स्मार्टफोन्स येतात. अशाच बजेटवाल्या फोनची माहिती तुम्हा या आर्टीकलमधून मिळणार आहे.
Realme C55 - या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची बॅटरीआहे, ज्यात 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्यासोबतच, फोन मध्ये 6.72 इंच FHD+ डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 90Hz आहे.
फोन मध्ये MediaTek Helio G88 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. तर, फोनमध्ये 64MP AI रियर कॅमेरा सेटअप आहे. त्यासोबतच फ्रंट 8MP कॅमेरा सेंसर आहे. फोन तीन स्टोरेज ऑप्शन 4GB+64GB, 6GB +64GB आणि 8GB+ 128GB मध्ये उपलब्ध आहे. या फोनला फ्लिपकार्ट व अमॅझॉनवरुन खरेदी करता येईल. किंमत १०,९९९ रुपये एवढी आहे.
POCO M5 - स्मार्टफोन हा 6.58 इंच FHD+ डिस्प्ले सह 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी असून MediaTek G99 प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. फोन मध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यासह, 8MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अमेझॉन व फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येईल.
Moto g32 - हा स्मार्टफोन 6.5 इंच डिस्प्ले सह90Hz रिफ्रेश रेट सपोर्टचा आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर Snapdragon 680 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, 50MP मेन कॅमेरा देण्यात आलाय. तर, फ्रंट मध्ये 16MP कॅमेरा आहे. पॉवर बॅकअप साठी फोन मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आलीय.
Samsung Galaxy F13- स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे. फोन मध्ये Exynos 850 प्रोसेसर सपोर्ट दिलाय. त्यात, 16.72 सेमी चा डिस्प्लेही आहे. या फोनमध्ये 50MP चा रियर कॅमेरा व 8MP का फ्रंट कॅमेराही देण्यात आलाय. फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्ट व अमॅझॉनवरुन खरेदी करता येईल.
Redmi 10 A - स्मार्टफोनमध्ये 16.58 सेमी एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. पॉवर बॅकअपसाठी फोन मध्ये 5000mAh ची बॅटरीही देण्यात आलीय. फोन मध्ये ऑक्टाकोर MediaTek Helio G25 चिपसेट सपोर्ट आहे. Redmi 10 A मध्ये एक 13MP रिअर कॅमेरा सेटअप असून फ्रंट 5MP कॅमेरा आहे. या फोनची किंमत 10,499 रुपये आहे.
Samsung Galaxy F13 - स्मार्टफोन इंडिया मध्ये 64GB आणि 128GB कॉन्फिगरेशन मध्ये 14,999 व 16,999 रुपयांच्या किंमतीत हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. कंपनीने स्मार्टफोन मध्ये 6000mAh ची बॅटरी दिलीय, जी 15w च्या फास्ट चार्जर ला सपोर्ट करते.
Samsung Galaxy F13 स्मार्टफोन मध्ये 6.6 इंच की फुल HD+ LCD डिस्प्ले आहे. त्यासाठी, गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन आहे. तसेच, सॅमसंगच्या या लेटेस्ट स्मार्टफोन मध्ये Exynos 850 चिपसेट आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह पेअर करण्यात आलाय. तसेच, सैमसंगच्या ह्या स्मार्टफोनची रॅम ला 8GB पर्यंत वाढवण्यात येऊ शकते. सध्या बाजारात किंमत ११,९९९ रुपये आहे.