So the yellow color is given to the JCB machine
...म्हणून जेसीबी मशिनला दिला जातो पिवळा रंग By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 09:16 PM2019-08-20T21:16:51+5:302019-08-20T21:21:07+5:30Join usJoin usNext जेसीबी मशिनचा उपयोग जगभरात केला जातो. जेसीबीच्या माध्यमातून जास्त करून खोदकाम केलं जातं. परंतु जेसीबीचा रंग पिवळाच का देण्यात आला आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर जेसीबी ही मशिन ब्रिटनच्या मशिन बनवणाऱ्या कंपनीचं उत्पादन आहे. जेसीबी तयार करणाऱ्या या कंपनीचं मुख्यालय इंग्लंडमधल्या स्टेफर्डशायर शहरात होतं. या कंपनीचा प्लांट चार महाद्वीपामध्ये पसरलेला होता. 1945मध्ये जेसीबी कोणत्याही नावाशिवाय लाँच करण्यात आली होती. ही मशीन तयार केल्यानंतर तिच्या नावासाठी बरेच दिवस विचारविमर्श करण्यात आला. त्यानंतर या मशिनचं नाव 'जोसेफ सायरिल बमफोर्ड' यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. जेसीबी मशिनच्या निर्मितीचा कारखाना ब्रिटिशांनी पहिल्यांदा भारतात सुरू केला होता. त्यानंतर आजमितीस भारत हा जगभरात जेसीबी मशिन निर्यात करणारा मोठा देश बनला आहे. या जेसीबी मशिनचा जास्तीत जास्त वेग प्रतितास 65 किलोमीटर आहे. या मशीनला प्रिन्स ऑफ वेल्स पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पहिल्यांदा जेसीबी मशिन पांढऱ्या आणि लाल रंगांमध्ये तयार होत होती. त्यानंतर त्या मशिनचा रंग बदलून पिवळा करण्यात आला. खरं तर जेसीबी खोदकामाच्या ठिकाणी सहजगत्या नजरेस पडते. मग दिवस असो वा रात्र पिवळ्या रंगामुळे ती मशीन लगेचच लक्षात येते. पुढे खोदकाम सुरू आहे हे समजण्यासाठीच या मशिनला पिवळा रंग देण्यात आल्याची माहिती आहे.