start your battery dead car with Power Bank
बॅटरी काढून पावर बँकेद्वारे सुरू केली टाटा नेक्सॉन; जाणून घ्या कसे... By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 05:08 PM2019-06-25T17:08:48+5:302019-06-25T17:14:59+5:30Join usJoin usNext सध्याच्या वाहनांमध्ये झीरो मेन्टेनन्स बॅटरी वापरण्यात येत आहे. यामुळे बॅटरीमध्ये सारखे पाणी भरण्याची किंवा तपासत राहण्याचा त्रास होत नाही. मात्र, आताच्या गाड्या या जास्त टेक्नोसेव्ही होत असल्याने बॅटरीवरच अनेक सुविधा अवलंबून असतात. यामुळे बॅटरी डेड होण्याची समस्या निर्माण होत आहे यामुळे वाहन जर उभे असेल तर धक्का मारण्याची वेळ येऊ शकते किंवा शेवटचा उपाय म्हणजे रोड साईड असिस्टंस. परंतू, याच तंत्रज्ञानाने एक नवा पर्याय उभा केला आहे. याच्या वापराने तुम्ही कारच्या खराब बॅटरीसोबत जंपस्टार्ट करू शकणार आहात. चला पाहूया काय आहे हा उपाय. हा, या नव्या उपायाचे नाव आहे Hummer H8. हे एक पोर्टेबल बॅटरी पॅक आहे, ज्याच्या मदतीने खराब बॅटरीच्या वाहनालाही जम्प स्टार्ट करता येणार आहे. एका युट्यूबरने Bulu Patnaik याचा प्रयोग त्याच्या डिझेल इंजिनच्या Tata Nexon वर करून दाखविला आहे. डिझेल इंजिनच्या वाहनांना सुरू करण्यासाठी जास्त क्षमतेची बॅटरी लागते. या युट्युबरने त्याच्या नेक्सॉन कारची बॅटरी हटवून या छोट्या पावर बँकच्या वापराने कार सुरू केली आहे. Hummer H8 पावर बँक वापरण्यासाठी एक विशेष केबल आहे, जी या पावर बँकेच्या स्लॉटमध्ये जाते. हा स्लॉट अशाप्रकारे बनविण्यात आला आहे की, निगेटीव्ह आणि पॉझिटीव्ह टर्मिनल एकत्र येत नाहीत. तसेच केबलच्या दुसऱ्या बाजुलाही रंग दिल्याने हा भ्रम निर्माण होत नाही. याशिवाय ही पावरबँक अन्य काही सेन्सरसह येते जे शॉर्ट सर्किट झाल्यास बॅटरीला बंद करते. या पावर बँकवर हिरवी लाईट दिसल्यास टर्मिनल पूर्णपणे जोडला गेला आहे आणि कारला आता सुरू केले जाऊ शकते. या या बॅटरी पॅकवर बूस्टर सिस्टिम मिळते जी दाबल्यानंतर बॅटरी पूर्ण संपलेली असल्यास वापरता येते. कारची बॅटरी काढलेली असल्याने युट्युबरने नेक्सॉन सुरू करण्यासाठी हे बटन दाबले होते. ही बॅटरी 8000 एमएएचची आहे, आणि तिला सर्वसाधारण पावर बँकेद्वारे चार्ज करता येते. या बॅटरीव्दारे 5 लीटरचे पेट्रोल आणि 3 लीटरचे डिझेल इंजिन सुरू करता येते. म्हणजेच नॅनो, अल्टोपासून मर्सिडिज पर्यंतच्या कार या बॅटरीद्वारे सुरू करता येतात.टॅग्स :टाटातंत्रज्ञानTatatechnology