take care of these things when buying a helmet; not only penalty but also save life
हेल्मेट खरेदीवेळी या गोष्टी नक्की पहा; दंड तर वाचेलच पण... By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 04:39 PM2019-11-04T16:39:04+5:302019-11-04T16:43:05+5:30Join usJoin usNext दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. बाजारात अगदी रस्त्याकडेलाही हेल्मेट विक्रीला असतात. दुचाकी खरेदी करताना ती कशी दिसते, कशी चालते, मायलेज किती, किती सीसी आदी भारंभार बाबी पाहिल्या जातात. मात्र, जीव वाचविणारे हेल्मेट घेताना त्याकडे केवळ दंड वाचविण्याचे साधन म्हणून पाहिले जाते. त्याची उपयुक्तता, टिकाऊपणा, दणकटपणा याकडे मुळीच पाहिले जात नाही. यामुळे रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचा सर्वाधिक मृत्यू होतो. हेल्मेट खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बाजारात 500 रुपयांपासून 3-4 हजार रुपयांपर्यंत हेल्मेट उपलब्ध असतात. यामध्ये स्टायलिश हेल्मेटही आहेत. काही हेल्मेट केवळ डोक्याचा वरचा भागच झाकतात. मात्र, अपघात झाल्यावर ही हेल्मेट तुमची सुरक्षा करण्यास अपयशी ठरतात. कारण जर खालच्या बाजुने तोंड आपटल्यास तिथे हेल्मेटचे आवरण येत नाही. हेल्मेटची गुणवत्ता खूप महत्वाची आहे. अनेकदा लोक कमी किंमतीचे हेल्मेट खरेदी करतात, त्यांची गुणवत्ता तुमचा जीव वाचविण्यापर्यंत नसतेच. जान बची तो लाखो पाए, या प्रमाणे दणकट आणि चांगल्या कपंनीचे आयएसआय मार्कअसलेले हेल्मेट घ्यावे. हेल्मेटचा महत्वाचा भाग म्हणजे पुढील काच. या काचेवर सड पडल्यास रात्रीच्यावेळी त्रास होते. कारण समोरील वाहनाची लाईट आल्याने पसरते आणि पांढरे दिसते. यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. चांगल्या कंपनीचे हॅल्मेट घेतल्यास त्याच्या काचाही चांगल्या प्रतीच्या असतात. त्यामुळे त्यांच्यावर सहजासहजी सड पडत नाहीत, तसेच त्या तुटतही नाहीत. रस्त्यावरच्या हेल्मेटमध्ये ही समस्या पहायला मिळतेच. हेल्मेटची साईज वेगवेगळी असते. यामुळे खरेदी करताना हेल्मेट डोक्यावर घालून पहावे. तुमच्यासाठी दृष्यमानता योग्य आहे की नाही हे ही पहावे.