Tasla model 3 car will talk with people in a crowded road; hacker gets 7 crores if he success
भन्नाट...गर्दीत लोकांशी कार बोलणार; हॅक करून दाखवेल त्याला 7 कोटी मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 03:58 PM2020-01-14T15:58:58+5:302020-01-14T16:04:00+5:30Join usJoin usNext : टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवर नवीन कार टेस्ला मॉडेल-३ चा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ही कार पाय़ी चालणाऱ्या लोकांशी बोलताना दिसत आहे. गर्दीच्या रस्त्यांवर ही कार लोकांना रस्ता सोडण्यास आणि बाजुला होण्यास सांगत आहे. मस्क यांनी म्हटले आहे की, टेस्ला लवकरच लोकांशी बोलणार आहे. हे खरे आहे. हे फिचर लवकरच इलेक्ट्रीक कारमध्ये दिसणार आहे. हे पूर्णपणे ऑडिओ प्लेअरवर चालणार आहे. हे नवे फिचर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित असण्याची शक्यता आहे. टेस्लाच्या कारचा वापर जे लोक उबर, ओलासाठी करतात ते लोक या फिचरचा जास्तीत जास्त वापर करू शकतील. जगभरात इलेक्ट्रीक कार बनविणासाठी प्रसिद्ध असलेल्या टेस्लाने या कारची सिक्युरिटी सिस्टीम ताकदवान असल्याचे म्हटले आहे. यावर मस्क यांनी मोठी पैजच लावली आहे. टेस्ला मॉडेल 3 ची सिस्टिम जो कोणी हॅक करून दाखवेल त्याला कंपनी 1 दशलक्ष डॉलर म्हणजेच 7.1 कोटी रुपये बक्षिस आणि 74 लाख रुपयांची ही कार भेट देणार आहे. या मॉडेल-३ ला वेंकुलरमधील मार्चमध्ये होणाऱ्या हॅकर्सच्या स्पर्धेमध्ये उतरविण्यात येणार आहे. या ठिकाणी हॅकर्स तंत्रज्ञान आणि त्यांना माहिती असलेल्या युक्त्यांद्वारे कारला हॅक करण्याचा प्रयत्न करतील. जर कोणी यामध्ये यशस्वी झाला तर त्याला कंपनी बक्षीस देणार आहे. गेल्या वर्षी हॅकर्सच्या एका ग्रुपने मॉडेल-एसला हॅक केले होते. यावेळी या ग्रुपला 35000 डॉलर आणि एक कार मिळाली होती. अमाता कामा आणि रिचर्ड झोऊ यांच्या टीमने हे यश मिळविले होते. टेस्लाच्या म्हणण्यानुसार ही एक चाचणी आहे ज्यामुळे सिक्युरिटी सिस्टीम सुधारण्यास मदत मिळते. या हॅकरनी टेस्लाची कार हॅक करून चुकीच्या लेनमध्ये घुसविली होती. टॅग्स :इलेक्ट्रिक कारElectric Car