TATA ची कार खरेदी करायचीय? त्वरा करा; मिळतेय ६५ हजारांची बंपर सूट, लवकरच किमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 01:05 PM2021-12-19T13:05:35+5:302021-12-19T13:11:24+5:30

डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या गाड्यांवर शानदार डिस्काउंट ऑफर केला जात आहे. पाहा, डिटेल्स...

गेल्या अनेक महिन्यांपासून TATA मोटर्सच्या कारचा खप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकी सोडल्यास अन्य आघाडीच्या कार उत्पादकांना टाटाने धोबीपछाड दिल्याचे दिसत आहे.

इतकेच नव्हे तर इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्येही टाटाच बाप ठरला असून, TATA च्या इलेक्ट्रिक कार देशात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्या आहेत. यातच आता टाटा मोटर्स आपल्या अनेक कारवर बंपर सूट देत आहे.

डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या गाड्यांवर शानदार डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या गाड्यावर ६५ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कंपनीच्या Tata Harrier, Safari, Tiago, Tigor, Nexon आणि Nexon EV या कारवर सूट दिली जात आहे.

टाटा अल्ट्रॉज आणि टाटा पंच या कार वर कोणतीही सूट दिली जात नाही. सर्वात जास्त डिस्काउंट टाटा हॅरियरवर दिला जात आहे. १ जानेवारी २०२२ पासून टाटाच्या कारच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे स्वस्त किंमतीत कार खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

Tata Harrier एसयूव्ही वर ६५ हजार रुपयांपर्यंत सूट ऑफर केली जात आहे. यात ४० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट आणि २० हजार रुपयाचे कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. यावर कोणत्याही प्रकारचा कॅश डिस्काउंट मिळत नाही.

ही स्कीम डार्क एडिशनला सोडून हॅरियरच्या सर्व व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. टाटा Safari वर डिसेंबर मध्ये ४० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट मिळत आहे. तसेच डिसेंबर महिन्यात Tata Nexon कॉम्पॅक्ट एसयूव्ही वर २५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Tata Nexon मध्ये १५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट आणि १० हजार रुपयाचे कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

टाटा नेक्सॉनची किंमत ७.२९ लाख रुपयांपासून सुरू होऊन १३.३४ लाख रुपयांपर्यंत जाते. याच पद्धतीने नेक्सॉन ईव्हीवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे.

Tata Tiago आणि Tigor वर डिसेंबर मध्ये अनुक्रमे ३५ हजार रुपये आणि ३० हजार रुपयाची सूट मिळत आहे. यात १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिटचा समावेश आहे.

टिगोरच्या कॉर्पोरेट खरेदीदारांना अतिरिक्त १० हजार रुपये मिळू शकते. तर टियागोच्या कॉर्पोरेट खरेदीदारांना ५ हजार रुपयाची सूट मिळू शकते.