TATA नं आणली नवी Electric Sedan कार; मिळणार 213kms ची ड्रायव्हिंग रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 03:33 PM2021-07-15T15:33:49+5:302021-07-15T15:45:54+5:30

TATA Electric Vehicle : ९० मिनिटांत कार होणार पूर्ण चार्ज. पाहा काय आहे खास या कारमध्ये.

देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सनं (TATA Motors) आपल्या फ्लिट ग्राहकांसाठी एक नवा ब्रॅन्ड ‘XPRES’ लाँच केला आहे. फ्लिट सेगमेंटच्या सर्वा वाहनांना आकर्षक पद्धतीनं डिझाईन करण्यात आलं आहे.

यामध्ये बॅज एक्सप्रेसही लावण्यात आलं आहे. प्रायव्हेट आणि फ्लिट व्हेईकलमध्ये फरक कळून यावा यासाठी हे देण्यात आलं आहे.

कंपनीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार एक्सप्रेस ब्रँडच्या अंतर्गत सर्वात पहिले इलेक्ट्रीक सेडान कार लाँच केली जाणार आहे. ही कंपनीची प्रसिद्ध सेडान कार Tigor चं नवं व्हर्जन असणार आहे.

ही नवी इलेक्ट्रीक कार कॉर्पोरेट आणि सरकारी विभागांच्या वापरासाठी अधिक उपयुक्त असतील, असं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या शिवाय इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरालाही यामुळे चालना मिळणार आहे.

एक्सप्रेस ब्रँड अंतर्गत लाँच केली जाणारी पहिली गाडी इलेक्ट्रीक सेडान असेल, ज्याला एक्सप्रेस टी ईव्ही असंही म्हटलं जातं.

याचं ध्येय कॉर्पोरेट आणि सरकारी फ्लिट ग्राहकांना उत्तम मोबिलिटी सर्विस देणं हे आहे. तसचं यात देण्यात आलेली बॅटरी ही फास्ट चार्जिंग सुविधा असणारी असेल.

आपण एक्सप्रेस ब्रँडची गाडी लाँच करून अतिशय खुश आहोत, असं मत पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे प्रेसिडेंट शैलेश चंद्रा म्हणाले.

ही फ्लिट ग्राहक, सरकार, कॉर्पोरेट आणि मोबिलिटी सर्विसेसच्या विशेष गरजा पूर्ण करत स्मार्ट आणि फ्युचर रेडी मोबिलिटी सोल्युशन देईल, असंही त्यांनी नमूद केलं.

ही कार काही ठराविकच डीलर्सकडे उपलब्ध असणार आहे. तसंच ही दोन ड्रायव्हिंग रेंजमध्ये मिळेल. या कारचं हायर व्हर्जन 213 किमी आणि लोव्हर व्हर्जन 165 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतं.

कंपनीनं या कारमध्ये 21.5kwh आणि 16.5kwh क्षणतेच्या बॅटरीचा वापर केला आहे. यामध्ये फास्ट चार्जिंग सिस्टमही देण्यात आलं आहे. हायर व्हर्जन 90 मिनिटांत चार्ज होईल, तर दुसरं व्हर्जन 0-80 मिनिटांत चार्ज होईल.