मस्तच! टाटा सफारी लॉन्च; 'या' तारखेपासून बुकिंगला सुरुवात; किंमत किती? वाचा By देवेश फडके | Published: January 27, 2021 06:04 PM 2021-01-27T18:04:27+5:30 2021-01-27T18:14:22+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टाटाने आपली फ्लॅगशिप एसयूव्ही सफारी भारतीय बाजारात सादर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टाटा सफारीच्या नवीन व्हर्जनबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती. टाटा सफारीला देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ पसंती दिली आहे. नवीन टाटा सफारी एसयूव्हीची किंमत, वैशिष्ट्ये जाणून घ्या... नवी दिल्ली : टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सफारी एसयूव्ही अखेर लॉन्च करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टाटाने आपली फ्लॅगशिप एसयूव्ही सफारी भारतीय बाजारात सादर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टाटा सफारीच्या नवीन व्हर्जनबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती.
टाटा सफारी ही लोकप्रिय एसयूव्ही आता नव्या अवतारात पुन्हा एकदा भारतीय बाजारात धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा सफारीला देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ पसंती दिली आहे. टाटा हा एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड मानला जातो.
नवीन टाटा सफारी 'टाटा हॅरियर'चे नवीन व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. ०४ फेब्रुवारी २०२१ पासून टाटा सफारीचे बुकिंग सुरू होईल, असे टाटा मोटर्सकडून जाहीर करण्यात आले आहे.
टाटा सफारी नव्या अवतारात सहा विविध व्हेरिअंट्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ, XZ+ या सहा व्हेरिअंट्सचा समावेश करण्यात आला आहे.
टाटाची ही लोकप्रिय एसयूव्ही पूर्वी Tata Gravitas नावाने ओळखली जात होती. टाटा सफारीचा नवीन लूक पहिल्यांदा ऑटो एक्स्पो २०२० मध्ये सादर करण्यात आला होता.
टाटा सफारीच्या नवीन व्हर्जनला २.० लीटर, ४-सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १७० BHP पॉवर आणि ३५० Nm टॉर्क निर्माण करत असून, यासोबत ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच इको, सिटी आणि स्पोर्ट्स, असे तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत.
नवीन सफारीची रचना, कार्यक्षमता, मल्टिटास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी अशी दमदार वैशिष्ट्ये नवीन टाटा सफारीची आहेत. नवीन Tata Safari मध्ये टाटाने 'OMEGARC' प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.
टाटाच्या नवीन सफारीची इंटिरिअर थीम Oyster White या आकर्षक रंगात असून, कंपनी यासोबत Ash Wood डॅशबोर्डही ऑफर करत आहे. कंपनीने व्हील आणि फ्रंटसाईडवर क्रोम फिनिश लूक दिला आहे.
भारतीय बाजारात टाटा सफारीची स्पर्धा Mahindra XUV500, Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसोबत असणार आहे.
टाटा सफारी रॉयल ब्ल्यू, व्हाइट आणि ग्रे या तीन रंगात उपलब्ध असेल. टाटाकडून सफारीची किंमत जाहीर करण्यात आली नसली, तरी नवीन टाटा सफारी एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत १५ ते २४ लाखांदरम्यान असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.