TATA ची कमाल कामगिरी! ‘ही’ SUV ठरली नंबर १; ब्रेझा आणि क्रेटाला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 03:56 PM2022-04-06T15:56:30+5:302022-04-06T16:00:49+5:30

टाटा नेक्सॉनने पुन्हा एकदा विक्रीच्या बाबतीत ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ब्रेझासह अन्य पॉप्यूलर एसयूव्हीला मागे टाकले आहे.

TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्या दमदार कामगिरी करत असून, यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही वाढला आहे. टाटा समूहातील टाटा मोटर्स ही कंपनी केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, तर शेअर मार्केटमध्येही कमाल कामगिरी करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून टाटा मोटर्स सातत्याने पहिल्या तीन क्रमांकात येत असून, टाटाच्या वाहनांची विक्री प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. यामध्ये Tata Nexon च्या विक्रीत कमालीची वाढ झाली असून, आपल्या स्पर्धक कंपन्यांच्या कारना मागे टाकत पुन्हा एकदा देशाची नंबर १ एसयुव्ही बनल्याचे म्हटले जात आहे.

टाटा मोटर्सचा भारतात जलवा सुरूच आहे. या एसयूव्ही सेगमेंटमध्ये देसी कंपनीने मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर्स आणि किआ मोटर्स सह बाकीच्या सर्व कंपन्यांना मागे टाकले आहे. यामुळे टाटा नेक्सॉन पुन्हा एकदा देशातील सर्वांत जास्त विकणारी एसयूव्ही बनली आहे.

गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च २०२२ मध्ये टाटा नेक्सॉनला ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ब्रेझा सह अन्य पॉप्यूलर एसयूव्हीला पुन्हा एकदा मागे टाकले आहे. बेस्ट सेलिंग एसयूव्ही सोबत गेल्या महिन्यात सर्वात जास्त विकणाऱ्या कारच्या लिस्टमध्ये चौथ्या नंबरवर राहिली आहे.

लाखो लोकांच्या मनपसंतीस उतरलेली टाटा नेक्सॉनची गेल्या महिन्यात बंपर विक्री झाली आहे. १४ हजार ३१५ लोकांनी या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला खरेदी केले आहे. मार्च २०२१ मध्ये याची केवळ ८ हजार ६८३ यूनिटची विक्री केली होती. त्यामुळे या वर्षी या कारच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळाली.

टाटा नेक्सॉनला XE, XM, XZ, XZ+ आणि XZ+(O) सोबत डार्क एडिशन ट्रिम सह खूप साऱ्या व्हेरियंट्स मध्ये आणले आहे. याची किंमत ७.४२ लाख रुपये ते १३.७३ लाख रुपयांपर्यंत आहे.

टाटा नेक्सॉन नंतर मारुती सुझुकी विटारा ब्रेझा मार्च २०२२ मध्ये दुसरी सर्वात जास्त विकणारी एसयूव्ही ठरली. याची एकूण १२ हजार ४३९ यूनिट विक्री झाली आहे. यानंतर ह्युंदाई क्रेटाला लोकांनी सर्वात जास्त पसंत केले आहे.

क्रेटाची एकूण १० हजार ५३२ यूनिटची विक्री झाली आहे. टाटाच्या मायक्रो एसयूव्ही टाटा पंचची गेल्या महिन्यात चांगली विक्री झाली आहे. १० हजार ५२६ लोकांनी या देसी एसयूव्हीला खरेदी केले आहे.

ह्युंदाई वेन्यूची एकूण ९ हजार २२० यूनिट, किआ सेल्टॉसची एकूण ८ हजार ४१५ यूनिट, टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची ७ हजार ९१७ यूनिट, मारुती अर्टिगाची ७८८८ यूनिट आणि किआ कारन्सची एकूण ७००८ यूनिट, महिंद्रा स्कॉर्पियोची एकूण ६०६१ यूनिट, महिंद्रा एक्सयूव्ही ७०० ची ६०४० यूनिटची विक्री झाली आहे.

टॅग्स :टाटाTata