Brezza नाही, Creta ही नाही! ‘ही’ देसी SUV बनली नंबर १; किती झाली विक्री? पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:29 PM2022-01-05T17:29:01+5:302022-01-05T17:34:44+5:30

या मेक इन इंडिया कारने बाकीच्या सर्व दिग्गज SUV कारला मागे टाकून मार्केटमध्ये नंबर वन क्रमांक पटकावला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत SUV कारची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे कार निर्माता कंपन्याही एसयूव्ही सेगमेंटकडे अधिक लक्ष देत आहेत.

आताच्या घडीला ऑटोमोबाइल क्षेत्र सेमीकंडक्टर चीपच्या कमतरतेचा मोठा सामना करत आहे. यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळूनही कंपन्या कारची डिलिव्हरी पूर्ण करू शकत नाहीत. मात्र, असे असूनही डिसेंबर २०२१ हा महिना कार निर्माता कंपन्यांसाठी चांगला ठरला आहे.

दुसरीकडे, टाटा मोटर्सला भारतीय ग्राहकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. सध्या ही भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. सध्या कंपनीचे मार्केट शेअर १५ टक्के आहे. नुकतेच टाटाने ह्युंदाईला मागे टाकून बाजारात दुसरा सर्वात मोठी कार निर्माता ब्रँड आपल्या नावावर केला आहे.

यानंतर आता टाटा मोटर्स कंपनीची पॉप्यूलर एसयूव्ही टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ने डिसेंबर २०२१ मध्ये जबरदस्त विक्री केली आहे. टाटा नेक्सॉनने बाकीच्या सर्व दिग्गज एसयूव्ही कारला मागे टाकून मार्केटमध्ये नंबर वन क्रमांक पटकावला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये कंपनीने नेक्सॉनची १२ हजार ८८९ यूनिटची सेल केली आहे. या कारच्या विक्रीत ८८.७ टक्के ग्रोथची नोंद करण्यात आली आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

Tata Nexon यात १.२ लीटरचे टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. दोन्ही इंजिनमध्ये ६ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन म्हणून स्टँडर्ड मिळते. तर यात ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन मिळतो.

ईव्ही सेगमेंट मध्ये टाटा नेक्सॉन नंबर वन आहे. Tata Nexon EV मध्ये परमानेंट मॅगनेट AC मोटर दिले आहे. यात पॉवरसाठी लिथियम आयन बॅटरी दिली आहे. जी लिक्विड कूल्ड आणि IP67 सर्टिफाइड आहे. म्हणजेच याची बॅटरी वॉटर रेजिस्टेंट आहे.

Nexon EV ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जिंगवर ३१२ किमी पर्यंत रेंज देते. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून TATA Motors कंपनीच्या कारची विक्री सातत्याने वाढताना दिसत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमीकंडक्टर चीपचे संकट असूनही टाटा मोटर्स कंपनी ग्राहकांची मागणी वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहे.

इलेक्ट्रिक सेगमेंटबाबत बोलायचे झाल्यास TATA ने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. डिसेंबर महिन्यात TATA ने एकूण ३५ हजार २९९ कारची विक्री केली. यापैकी २ हजार २५५ इलेक्ट्रिक कार आहेत. आताच्या घडीला टाटा मोटर्सच्या Tata Nexon EV आणि Tata Tigor EV या दोन कार इलेक्ट्रिक पर्यायात उपलब्ध आहेत.

Tata Nexon EV या इलेक्ट्रिक कारला सर्वाधिक मागणी असून, ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. टाटा नेक्सॉन ईव्हीच्या जबरदस्त कामगिरीनंतर टाटाने लगेचच Tata Tigor EV लॉंच करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टाटा टिगोर ईव्ही या कारच्या मागणीतही मोठी वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

TATA Motors ने डिसेंबर महिन्यात २२५५ इलेक्ट्रिक कारची विक्री केली. तर नोव्हेंबर महिन्यात टाटाने १७५१ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. गेल्या वर्षाची तुलना केली, तर याच कालावधीत म्हणजेच डिसेंबर २०२० मध्ये टाटा मोटर्सच्या केवळ ४१८ इलेक्ट्रिक कारची विक्री झाली होती. यामुळे टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ४३९ टक्क्यांची दणदणीत वाढ नोंदवली आहे.

TATA Motors ने ऑक्टोबर २०२१ या महिन्यात १५८६ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. तसेच गेल्या वर्षभरातील प्रत्येक महिन्यात जवळपास १८.५३ टक्के वाढ नोंदवल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली Tata Punch ही कारही इलेक्ट्रिक स्वरुपात सादर होणार असल्याचे म्हटले जात आहे.