जबरदस्त रेंजसह Tata Nexon EV Max लॉन्च; किंमत किती? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 01:07 PM 2022-05-11T13:07:55+5:30 2022-05-11T13:13:19+5:30
Tata Motors नं अधिक रेंज वाली Tata Nexon EV Max नवी कार बुधवारी लॉन्च केली आहे. कंपनीची ही कार सिंगल चार्ज मध्ये ४३७ किमीपर्यंत चालू शकते. जाणून घेऊयात सारंकाही... टाटा मोटर्सनं आपली जास्त रेंजवाली इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन इव्ही मॅक्स (Tata Nexon EV Max Launch) लॉन्च केली आहे. या नव्या कारचं वैशिट्य म्हणजे सिंगल चार्जमध्ये तब्बल ४३७ किमी अंतर पार करू शकते.
नव्या नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्ये रेंजसोबतच नेक्सॉन ईव्हीच्या तुलनेत ३० नवे फिचर्स देखील देण्यात आले आहेत. नवी नेक्सॉन फक्त ५६ मिनिटांत ८० टक्के चार्ज होऊ शकते. त्यामुळे नवी नेक्सॉन फास्ट चार्जिंगसाठी सक्षम असणार आहे.
7.2kW एसी फास्ट चार्जरच्या माध्यमातून रेग्युलर टाइममध्ये नवी नेक्सॉन ६.५ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. तर व्यावसायिकरित्या वापर केले जाणाऱ्या 50kW डीसी चार्जरनं नवी कार अवघ्या ५६ मिनिटांत ८० टक्के चार्ज होऊ शकेल.
नव्या टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्ये 40.0kWh क्षमतेचा पावरफुल लिथियम आयन बॅटरी पॅक दिला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या नेक्सॉन ईव्हीपेक्षा या बॅटरीची क्षमता ३३ टक्क्यांनी अधिक आहे. बॅटरी पॅक वाढविण्यात आलं असलं तर कारच्या एकूण वजनात देखील फरक पडलेला नाही ही कारची जमेची बाजू मानली जात आहे.
नवी नेक्सॉन ईव्ही मॅक्स 143PS च्या सर्वोत्तम पावर जनरेट करते. तर या कारची टॉपस्पीड १४० किमी प्रतितास इतकी झाली आहे.
Tata Nexon EV Max ची किंमत नव्या Tata Nexon EV Max कारचे दोन सेगमेंट कंपनीनं बाजारात आणले आहेत. यात XZ+ आणि XZ+ Lux अशा दोन प्रकारात कार उपलब्ध करुन देण्यात आळी आहे. तसंच यात चार्जिंगचे दोन पर्याय देखील उपलब्ध असणार आहेत. टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्सची किंमत १७.७४ लाखांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची किंमत १९.२४ लाख रुपये इतकी आहे.
Nexon EV Max मध्ये ३ ड्रायव्हिंग मोड नव्या टाटा नेक्सॉन ईव्ही मॅक्समध्ये तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. यात इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे पर्याय आहेत. तसंच यात Multi Mode Regen चं फिचर देखील दिलं गेलं आहे. यामुळे ड्रायव्हरला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग लेव्हल सहजरित्या अॅडजस्ट करण्यास मदत मिळते.
ब्रेकिंग सिस्टम कमाल Tata Nexon EV Max मध्ये कंपनीनं जबरदस्त ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. कारच्या चारही चाकांना डिस्क ब्रेकची सुविधा आहे. तर पार्किंगसाठी हँडब्रेकच्या जागी इलेक्ट्रिक पावर ब्रेक देण्यात आला आहे. कारच्या पुढील सीट्स व्हेंटिलेटेड देण्यात आल्या आहेत. तर बॅटरी सुरक्षित ठेवण्यासाठी लिक्विड कूल सिस्टम कारमध्ये देण्यात आली आहे.
नव्या Tata Nexon EV Max मध्ये तुम्हाला बॅटरी आणि मोटारवर ८ वर्ष किंवा १.६० लाख KM पर्यंतची वॉरंटी देण्यात येत आहे. तर कारची वॉरंटी ३ वर्ष किंवा १.२५ किमी इतकी असणार आहे.