१० लाख रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' ५ कारमध्ये मिळतील ६ एअरबॅग्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 16:15 IST2024-06-22T15:58:32+5:302024-06-22T16:15:35+5:30
तुम्ही अशा पाच कार पाहू शकता, ज्यामध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग मिळतात.

तुम्हाला कार खरेदी करायची आहे आणि तुमचे १० लाखांपर्यंत बजेट आहे. अशा परिस्थितीत तुम्ही अशा पाच कार पाहू शकता, ज्यामध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग मिळतात. तर या मॉडेल्सची किंमत जाणून घ्या...
Hyundai Exter :
१० लाखांपेक्षा स्वस्त असलेल्या या एसयूव्हीमध्ये तुम्हाला सहा एअरबॅग्ज (स्टँडर्ड म्हणजे सर्व व्हेरिएंट्स) मिळतील. या कारची सुरुवातीची किंमत ६,१२,८०० रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Hyundai Aura:
या सेडानला Hyundai Exter प्रमाणे सुरक्षेसाठी सहा एअरबॅग मिळतात. या कारची सुरुवातीची किंमत ६,४८,६०० रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Tata Nexon :
टाटा मोटर्सच्या या एसयूव्हीच्या सर्व व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग उपलब्ध आहेत. या कारची सुरुवातीची किंमत ७,९९,९९० रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
Kia Sonet :
आता किया सोनेटच्या सर्व व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग उपलब्ध आहेत. या कारची किंमत ७ लाख ९९ हजार रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
Maruti Suzuki Baleno:
या प्रीमियम हॅचबॅकमध्येही ग्राहकांना सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅगचा लाभ मिळतो. या कारची सुरुवातीची किंमत ६,६६,००० रुपये (एक्स-शोरूम) आहे.