Tata Safari bookings officially open at 30000 rupees launch on February 22
केवळ ३० हजार रूपयांत करा Tata Safari बुक; पाहा कधी होणार SUV लाँच By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 08:10 PM2021-02-04T20:10:17+5:302021-02-04T20:21:33+5:30Join usJoin usNext Tata Safari आता नव्या रुपात पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत येणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं या SUV ची एक झलक दाखवली होती. परंतु आता कंपनीनं या कारचं बुकिंग सुरू केलं आहे. केवळ ३० हजार रूपयांमध्ये ग्राहकांना ही कार बुक करता येणार आहे. दरम्यान ही कार २२ फेब्रुवारी रोजी लाँच केली जाणार आहे. तसंच याच दिवसापासून या कारची डिलिव्हरीही सुरू केली जाईल. टाटा सफारी ही कार टाटा मोटर्सच्या इम्पॅक्ट २.० डिझाईन लँगवेजवर बेस्ड असणार आहे. याव्यतिरिक्त टाटा सफारीमध्ये कंपनी OMEGARC प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. या कारमध्ये ओयस्टर व्हाईट थीम असलेलं इंटिरिअर देण्यात आलं आहे. तसंच अॅशवूड डॅशबोर्डही देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कारमध्ये फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट असेल. तसंच त्याचा Apple CarPlay आणि Android Auto लादेखील सपोर्ट करेल. New Tata Safari मध्ये स्टेप्ड रूफ असेल. ऑटो एक्स्पो २०२० मध्ये टाटा सफारीला ग्रॅव्हिटास या कोडनेमनं शोकेस करण्यात आलं होतं. टाटा सफारीमध्ये २.० लिटर, ४ सिलिंडर इंजिन असण्याची शक्यता आहे. जे १७० बीएचपी पॉवर आणि ३५० एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसंच याव्यतिरिक्त या कारमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त सफारीमध्ये टर्बो पेट्रोल इंजिन आणि त्यासोबतच DCT गिअरबॉक्स असण्याचीही शक्यता आहे. टाटा सफारी नव्या जनरेशनच्या Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांना टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे.टॅग्स :टाटावाहनऑटो एक्स्पो 2020कारTataAutomobileauto expocar