Tata Tiago NRG CNG Launched : TATA नं या स्वस्त कारचं CNG मॉडेल केले लाँच; जबरदस्त मायलेज, पाहा किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 01:14 PM2022-10-29T13:14:48+5:302022-10-29T13:19:27+5:30

Tata Tiago NRG CNG Launched : या कारनं टाटा मोटर्सच्या विक्रीत केली होती मोठी वाढ. आता कंपनीनं या कारचं सीएनजी मॉडेल लाँच केलं आहे.

Tata Tiago NRG CNG Launched : टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमध्ये टियागोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटाच्या नव्या इनिंगची सुरुवात टियागोपासूनच झाली आहे. टाटाच्या कारच्या विक्रीचा आलेख उंचावण्याचे काम टियागोने केले आहे. टियागोनंतर टिगोर, नेक्सॉन, अल्ट्रोज आणि पंच यांनाही लोकांनी पसंती दिली.

कंपनीने Tiago चे NRG व्हेरिअंटदेखील लाँच केले आहे. हे टॉप-स्पेक XZ आणि XT ट्रिममध्ये येते. आता कंपनीने Tiago NRG चे iCNG व्हेरिअंटदेखील लाँच केले आहे. Motor Arena ने यासंबंधीचे अपडेट शेअर केले आहे.

टाटा मोटर्सच्या डीलर्सना Tiago NRG CNG लाँच करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. टाटा मोटर्सने खुलासा केला की Tiago NRG त्याच्या स्टाइल आणि डिझाइनमुळे ग्राहकांना आवडते. 2021 मध्ये फेसलिफ्ट आणि BS6 अपग्रेडने मुळे ही कार अधिक प्रीमियम आणि आकर्षकदेखील बनली आहे.

कारनं आपल्या सेगमेंटमध्ये उत्तम फीचर्स, ड्राइव्हबिलिटी, सेफ्टी आणि कम्फर्टसोबत बेंचमार्क सेट केला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये सीएनजीच्या कार्सच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात विक्री आणि मागणी दिसून आली आहे. सीएनजी सेगमेंटमध्ये वाढती मागणी पाहता टियागो आयसीएनजी भारताची पहिली टफरोडर सीएनजी लाँच करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सध्याच्या Tiago NRG XT ची किंमत 6.42 लाख रुपये आणि XZ ची किंमत 6.83 लाख रुपये आहे. Tiago च्या CNG व्हेरिअंट किंमत त्यांच्या पेट्रोल समकक्षांपेक्षा 91 हजारांनी अधिक आहे. Tiago NRG CNG ची किंमत समान ठेवण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. तसे असल्यास, Tiago NRG XT CNG ची एक्स-शोरूम किंमत 7.33 लाख रुपये आणि NRG XZ CNG ची किंमत 7.74 लाख रुपये असू शकते.

टाटा टियागो एनआरजी सीएनजी आता डीलरशिपवर बिलिंगसाठी उपलब्ध आहे. Tiago NRG मध्ये CNG 1.2-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल जे CNG वर चालवल्यास 72 Bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क जनरेट करेल. त्याचे मायलेज 26.4km/kg असेल. कंपनीकडून या कारच्या किमतीची अधिकृत घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते. ही कार ग्रे, व्हाईट, रेड आणि फॉलीएज ग्रीन कलरमध्ये लाँच केली जाईल.