Teaser of Kias first dedicated electric car EV6 released See First Look know details
Kia च्या पहिल्या डेडिकेटेड इलेक्ट्रिक कार EV6 चा टिझर जारी; पाहा फर्स्ट लूक By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:55 PM2021-03-09T14:55:22+5:302021-03-09T15:03:53+5:30Join usJoin usNext Kia EV6 : पाहा फर्स्ट लूक आणि कशी आहे ही कार दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Kia लवकरच आपली इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच करणार आहे. कंपनीनं आपल्या पहिल्या डेडिकेटेड इलेक्ट्रिक कार EV6 चा टीझर जारी केला आहे. Kia EV6 मध्यं कंपनीनं नव्या ईव्ही प्लॅटफॉर्मचा (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) वापर केला आहे. या तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेली कंपनीची ही पिहिली इलेक्ट्रिक कार आहे. याव्यतिरिक्त EV6 कंपनीनीच्या नेक्ट जेन बीईव्हीच्या धर्तीवर डेव्हलप करण्यात आली आहे. Kia च्या म्हणण्यानुसार EV6 त्याचा ब्रँड लोगो ‘Movement That Inspires’ आणि डिझाईन फिलॉसॉफीप्रमाणे आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये या कारचं वर्ल्ड प्रिमिअर केलं जाईल. कंपनीनं आपल्या EVs नाव ठेवण्यासाठी एका नव्या स्टॅटजीचा वापर केला आहे. यामध्ये ग्राहकांना Kia च्या इलेक्ट्रिक कार्सबाबात माहिती मिळणार आहे. तसंच कोणती कार पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे हेदेखील समजणार आहे. कंपनीनं आपल्या EV सीरिजच्या नावामागे एका नव्या पद्धतीचा वापर केला आहे. कंपनीच्या सर्व डेडिकेटेड BEV चं नाव EV नं सुरू होणार आहेत. यामध्ये ग्राहकांना एखादी कार पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे का याची माहिती मिळेल. याशिवाय गाडीच्या नावात EV नंतर लाईनअपमध्ये कारच्या पोझिशननुसार नंबर दिला जाणआर आहे. जसं की EV6 चा अर्थ असा की ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक असून ही कंपनीच्या लाईनअपमध्ये असलेली सहावी कार आहे. Kia हा एक ग्लोबल मोबिलिटी ब्रँड आहे जो १९४४ मध्ये सुरू करण्यात आला होता. या समूहाचे जगभरात १९० मार्केट्स आणि ६ देशांमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत. सध्या या कंपनीत एकूण ५२ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी सद्यस्थितीत वर्षाला ३० लाख कार्सची विक्री करते. कंपनीचा ब्रँड लोगो ‘Movement that inspires’ असा आहे. या अर्थ असा की असं पाऊल उचला की ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल.टॅग्स :वाहनकिया मोटर्सइलेक्ट्रिक कारदक्षिण कोरियाAutomobileKia Motars CarsElectric CarSouth Korea