The Motoroid 2, Yamaha's latest concept bike, takes a unique approach to two-wheel mobility
मालकाला ओळखणार, इशाऱ्यावर चालणार; Yamaha ची विना हँडल बाईक नवा इतिहास घडवणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:56 AM2023-12-19T09:56:15+5:302023-12-19T10:02:12+5:30Join usJoin usNext जपानी दुचाकी वाहन उत्पादन कंपनी Yamaha नेहमी तिच्या शानदार लूक आणि डिझाईनसाठी ओळखली जाते. आता Yamaha नं नवीन कॉन्सेप्ट लॉन्च करत पारंपारिक डिझाईनला पूर्णपणे छेद दिला आहे. या कॉन्सेप्टच्या माध्यमातून कंपनी मशीन आणि मानव यांच्यात एका पार्टनरसारखे बॉन्ड विकसित करण्याचा विचार करत आहे. जर तुम्हाला कुणी अशी बाईक चालवायला दिली ज्याला हँडलच नाही, तर तुम्हाला हा मोठा विनोद वाटेल. परंतु Yamaha नं या कॉन्सेप्टमध्ये Motoroid 2 लॉन्च केलीय ज्याला हँडल नाही. या बाईकमध्ये असे फिचर्स देण्यात आलेत जे आजतागायत तुम्ही कुठल्याही इतर टू व्हिलरमध्ये बघितले नसतील. या टू व्हिलरचे फ्यूचरिस्टिक डिझाईन आणि तंत्रज्ञान अनोखे आहे. ज्यात ट्विस्टिंग स्विंगआर्म, एआय फेशियल रिकग्निशन आणि सेल्फ बॅलेन्सिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही बाईक स्वत: तिचा तोल सांभाळते आणि कुठल्याही स्टॅंडशिवाय ती जागेवर उभी राहू शकते. ही कॉन्सेप्ट बाईक अगदी एखाद्या सायन्स सिनेमात दिसणाऱ्या काल्पनिक बाईक्ससारखी आहे. या टू व्हिलरमध्ये फेशियल रिकग्निशन प्रणाली दिलीय. जी बाईकच्या मालकाचा चेहरा ओळखून तिचे सर्व फिचर्स एक्टिव्ह करते. सध्या कॉन्सेप्ट म्हणून ही बाईक लॉन्च झालीय. कंपनीच्या दाव्यानुसार, Motoroid 2 कॉन्सेप्ट एकप्रकारे भविष्यात मानव आणि मशीन यांचे संबंध कसे असतील याचे उत्तर आहे. ही बाईक पाहण्यात अजब आणि रोमांचक असेल Motoroid 2 कॉन्सेप्ट कंपनीच्या पारंपारिक हँडलबारच्या जागी स्टडी हँडग्रिप्स देईल. ही बाईक एक फ्यूचरिस्टिक लूक देते परंतु या रचनेवरून तिच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. Yamaha कंपनीनं म्हटलंय की, ही मॉडेल रायडर आणि मशीन यांच्यातील संबंध मजबूत करण्यात मदत होईल. ज्यात मशीन आणि मानव एकमेकांच्या सहाय्याने काम करतील. कंपनीनं २०१७ मध्ये पहिल्यांदा Motoroid कॉन्सेप्ट आणला होता. त्यावर आजही संशोधन सुरू आहे. मशीन आणि मानव यांच्यात खास बॉन्डिंग करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात येत आहेत. सध्या कंपनीने जो मॉडेल समोर आणलाय तो आधुनिक तंत्रज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. Motoroid 2 पर्सनल मोबिलिटीसाठी जबरदस्त बाईक आहे. जी आपल्याला मालकाला ओळखते. जेव्हा कधी याच्या सीटवर बसून प्रवास करेल तेव्हा एखाद्या मनुष्यासोबतच आपण प्रवास करतोय असा भास होईल. मालकाच्या चेहऱ्याचे हावभाव ओळखून आणि त्यावर रिएक्ट करण्यासाठी इमेज रिग्नाइजेशन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रणालीचा अगदी खुबीने वापर करण्यात आला आहे. हब ड्राव्हेन रियर व्हिलवाली या इलेक्ट्रिक दुचाकीनं हबला एका स्विंगआर्मवर लावले आहे. जो सीटखाली दिलेल्या मोटारला जोडलेला आहे. स्विंगआर्म हा मागील चाकाला पुढे आणि मागे जाण्याची सुविधा देतो. मोटरॉईड २ मध्ये सेंटरमध्ये दिलेला बॅक्टरी बॉक्सही फिरू शकतो जेणेकरून बाईकच्या वजनाचा समतोल साधून योग्य हालचाल करू शकेल. ही बाईक लॉन्च करताना कंपनीने जो डेमो दिला त्यात ही बाईक विनारायडर चालत होती. दुचाकीसमोर उभी असणाऱ्या महिला मॉडेलच्या एक्सप्रेशन आणि एक्शनला ध्यानात ठेऊन बाईक मूवमेंट करत होती. त्यामुळे ही बाईक केवळ सेल्फ बॅलेन्सिंग तंत्रज्ञानानेच युक्त नव्हे तर विना रायडर चालण्यासही सक्षम असल्याचे दिसून येते. परंतु अद्याप या बाईकचे कंट्रोल कसे होणार हे स्पष्ट नाही. कारण ही एक सेल्फ बॅलेन्सिंग बाईक आहे जी मालकाच्या इशाऱ्यावर चालू शकते त्यामुळे ती कंट्रोल करणे आणि चालवणे सहज सोपे आहे. Yamaha Motoroid 2 ही बाईक कॉन्सेप्ट म्हणून पुढे आलीय. परंतु प्रत्यक्षात रस्त्यावर ती कधी उतरेल हे सांगणे कठीण आहे. मात्र Yamaha नं हा कॉन्सेप्ट कॅन्वासवर उतरवण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे.टॅग्स :यामहाyamaha