नव्या अल्टोने केले सर्वांना दिवाने! ज्याने पाहिली तो प्रेमात पडला; तुम्हीही म्हणाल क्यूट... By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:25 PM 2022-06-24T12:25:19+5:30 2022-06-24T12:30:11+5:30
रेट्रो स्टाईलच्या नव्या सुझुकी अल्टो लेपिन एलसीमध्ये ४ डबल टोन कलर ऑप्शन आणि ७ सिंगल कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. सुझुकीने नुकतीच नवीन अल्टो जपानमध्ये लाँच केली आहे. या अल्टोचे नाव अल्टो लेपिन एलसी असे आहे. या लाँचनंतर अल्टोच्या लुकने सर्वांना वेड लावले आहे. यामध्ये रेट्रो लुक खूपच सुंदरतेने देण्यात आला आहे. या कारला जो -तो क्यूट म्हणत आहे.
नवी सुझुकी अल्टो लेपिन एलसीमध्ये 660 सीसीचे ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही जवळपास 63 बीएचपी ताकद तयार करते. यामध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह आणि ४ व्हील ड्राईव्हही देण्यात आले आहे.
रेट्रो स्टाईलच्या नव्या सुझुकी अल्टो लेपिन एलसीमध्ये ४ डबल टोन कलर ऑप्शन आणि ७ सिंगल कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. ही छोटी कार असली तरी त्यात चार लोक आरामात बसू शकतात. ४ डबल टोन कलर ऑप्शनमध्ये किंमत वाढत जाते.
नवी सुजुकी ऑल्टो लेपिन एलसीची किंमत 1,496,000 येन (8 लाख रुपये) सुरु होते. ही टू व्हील ड्राईव्हची किंमत आहे. तर फोर व्हील ड्राईव्हची किंमत 1,597,200 येन म्हणजेच ९ लाख रुपये आहे.
कारमध्ये नवीन ग्रील देण्यात आली आहे. मोठे गोल एलईडी लाईट देण्यात आली आहे. कोणीही म्हणेल की ही कार बीएमडब्ल्यू ग्रुपच्या मिनी कूपरसारखी दिसते.
आतील भागात चेक डिझाइनसह सीट कव्हर्स मिळतील, जे लेदरसह ड्युअल टोन फिनिशिंगमध्ये येतात. मागील सीटसाठी कप होल्डर, हेडरेस्ट देण्यात आलेला आहे.
सध्याची अल्टो ही आऊटडेटेड झाली आहे. यामुळे नवीन अल्टो मारुती घेऊन येण्याची शक्यता आहे.