These are low maintenance cars.
या आहेत कमी मेन्टेनन्सवाल्या कार.... By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 05:43 PM2018-10-09T17:43:21+5:302018-10-09T17:48:04+5:30Join usJoin usNext आज वाढत्या इंधनाच्या काळात गाडीची देखभाल करणेही कठीण बनले आहे. देखभाल खर्च बऱ्याचदा खिशावर ताण आणतो. यामुळे प्रत्येकजण कमी मेन्टेनन्सवाली कार खरेदी करण्याकडे भर देत आहे. टोयोटा इटिऑस टोयोटोच्या कार सर्वात कमी खर्चिक म्हणून ओळखल्या जातात. या कारचे इंजिन ऑईल वारंवार बदलावे लागत नाही. पहिली सर्व्हिस 1 हजार किमी मोफत असते. तर दुसरी सर्व्हिस 10 हजार किमी 1350 रुपयांत होते. तिसरी सर्व्हिस 20 हजार किमीनंतर 2350 रुपयांत होते. तर चौथ्या सर्व्हिससाठी 3194 रुपये खर्च होतात. या कारचा सहा वर्षांचा देखभाल खर्च सरासरी 18 रुपये आहे. ह्युंदाई ग्रँड आय 10 कोरियाच्या कार निर्माता कंपनीची ही कमी मेन्टेनन्सवाली कार आहे. या कारसोबत कंपनी तीन लेबर सर्व्हिस फ्री देण्यात येतात. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या सर्व्हिसचा खर्च 3000 रुपये येतो. रेनॉल्ट क्विड रेनॉल्ट कंपनीच्या क्विडनेही भारतीय बाजारात कमी काळात मोठी झेप घेतली आहे. ही कार स्वस्त तर आहेच पण या कारचा मेन्टेनन्सही खिशावर भार टाकत नाही. या कारच्या मेन्टेनन्सचा खर्च 2 ते 3 हजार रुपये येतो. मारुति सुजुकी अल्टो, के10 मारुतीची अल्टोची लोकप्रियता कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. या कारचा मेन्टेनन्स आणि किंमतही कमी आहे. तीन सर्व्हिस मोफत असून यापुढील सर्व्हिसचा खर्च 2400 ते 3200 रुपये येतो. मारुती स्विफ्ट मारुती स्विफ्टला तीन सर्व्हिस मोफत मिळतात. पिहली सर्व्हिस 1000 किमी किंवा पहिला महिना असते. यानंतर 5000 किमी किंवा 6 महिने आणि तिसरी सर्व्हीस 10 हजार किमी किंवा 12 महिन्यांत करायची असते. पहिल्या वर्षातील मेन्टेनन्सचा खर्च 2100 रुपये येतो. दुसऱ्या वर्षात 4200 आणि तिसऱ्या वर्षात 3300 रुपये खर्च येतो. टॅग्स :कारcar