कार घ्यायचा विचार करताय?, कुटुंबासाठी बेस्ट ठरतेय Maruti ची गाडी; मायलेजही मिळतंय जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:05 PM2022-06-15T16:05:11+5:302022-06-15T16:16:59+5:30

Maruti Suzuki Car - गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेली ही एमपीव्ही ठरली आहे.

सध्या अनेक ग्राहकांची पसंती मारूती सुझुकीच्या कार्सना मिळत आहे. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुतीची कार देखील चांगला पर्याय ठरू शकतो. दरम्यान, तुमचं कुटुंब मोठं असेल तर तुम्ही एमपीव्हीचाही विचार करू शकता.

मारुती अर्टिगा गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी एपीव्ही बनली आहे. गेल्या वर्षी मे 2021 मध्ये त्याची 2,694 युनिट्सची विक्री झाली, तर मे 2022 मध्ये, मारुती सुझुकीने देशांतर्गत बाजारात एकूण 12,226 युनिट्सची विक्री केली. या आकडेवारीनुसार, मे 2022 मध्ये त्याची वार्षिक विक्री 354 टक्क्यांनी वाढली आहे.

टॉप MPV च्या यादीत महिंद्रा बोलेरो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मे 2021 मध्ये, या कारच्या 3,517 युनिट्सची विक्री झाली होती, परंतु यावर्षी मे महिन्यात या कारच्या 8,767 युनिट्सची विक्री झाली आहे. या वर्षी मे महिन्यात महिंद्रा बोलेरोच्या वार्षिक विक्रीत 149 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मारुती सुझुकीच्या अर्टिगा या गाडीची लोकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. सध्या या गाडीसाठी खुप मोठा वेटिंग पीरिअडही आहे. या कारच्या सीएनजी व्हेरिअंटसाठी तुम्हाला जवळपास सात ते नऊ महिन्यांचा वेटिंग पीरिअड लागू शकतो. लोकांची या फॅमिली कारला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

कंपनीने अर्टिगा या 7-सीटर MPV मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे कारला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. नवीन कार जुन्या मॉडेलच्या तुलनेत दिसण्यात थोडी वेगळी आहे. अर्टिगा भारतात पहिल्यांदा 2012 मध्ये लॉन्च करण्यात होती. त्यानंतर ग्राहकांमध्ये या परवडणाऱ्या फॅमिली कारची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही.

मारुती सुझुकीने 2022 मॉडेल अर्टिगा MPV ला 11 व्हेरिएंट्समध्ये लॉन्च केले आहे,  ज्यामध्ये VXi, ZXi आणि ZXi Plus ला ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मिळतात, तर CNG ऑप्शन देखील दोन व्हेरिएंट्ससह उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवीन मारुती अर्टिगा सह, कंपनीने आधीच अॅडव्हान्स K-Series Dual VVT इंजिन दिले आहे, जे पूर्वीच्या इंजिनच्या तुलनेत खूपच किफायतशीर आहे. कंपनीने हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज केले आहे आणि आता ऑटोमॅटिक व्हेरियंटसह नवीन 6-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनीने ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील दिले आहेत.

मारुती सुझुकीने 2022 अर्टिगाच्या बाहेरील भागामध्ये आमुलाग्र बदल केला आहे, जो आता दोन-रंगाच्या अलॉय व्हील आणि ग्रिलवर नवीन क्रोम फिनिशसह येतो. कंपनीने ही कार 6 रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये सिल्व्हर आणि ब्राऊन हे नवीन रंग आहेत.

कारच्या केबिनमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहे आणि MPV आता नवीन 7-इंचाच्या टचस्क्रीन डिस्प्लेसह येते,  जी Suzuki Connect आणि Amazon Alexa ला सपोर्ट करते. ही कार 20 किमी प्रति लिटर इतकं मायलेज देते. तर या कारची किंमत 8.35 लाख ते 12.79 लाख (एक्स शोरुम) इतकी आहे.