The third generation of Mercedes arrived; Charming CLS Coupe Launched In India
मर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 04:55 PM2018-11-16T16:55:59+5:302018-11-16T17:00:06+5:30Join usJoin usNext जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनी मर्सिडिज बेंझने आपली ऑल न्यू थर्ड जनरेशनची CLS 4-डोअर कुपे कार भारतात आज लाँच केली. सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 84.7 लाख रुपये असून ही कार ऑडी A7 आणि ऑडी A7 ग्रान कुपे यांना कडवी टक्कर देणार आहे. मर्सिडिज बेंझ CLS मध्ये कंपनीने नवीन लूक दिलेला असला तरीही तिच्यामध्ये मर्सिडिजच्या कारचे रुप दिसते. नवीन ग्रील डिझाईनसोबत आकर्षक हेडलँप देण्यात आले आहेत. मागील बाजुला मर्सिडीज-बेंज कूपे टेल लँप क्लस्टरसोबत हॉरिझंटल टेल लँप्स आणि छोटे स्टबी बूट देण्यात आले आहे. याशिवाय कारमध्ये 5 स्पोक 15 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. सीएलएसच्या इंटेरिअरमध्ये आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे. याशिवाय डॅश बोर्डवर वुडन एडॉर्न्ससोबत चार जेट टर्बाइन प्रेरित एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. दोन मोठ्या स्क्रीन एक इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि दुसरी डिजिटल डॅशबोर्डसाठी देण्यात आली आहे. नवीन सीएलएस 5 सीटर कार आहे. सीएलएसच्या CLS300d मॉडेलमध्ये BS-VI मानांकनाचे 2.0 लीटर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 242bhp ताकद निर्माण करते. CLS 9-स्पीड ड्युअल क्लच अॅटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यासाठी 6.2 सेकंद लागतात. सर्वाधिक वेग 250 किमी प्रती तास आहे. टॅग्स :मर्सिडीज बेन्झकारMercedes Benzcar