those Who will purchase new car; He will get 50 thousands from the government
जो नवीन कार घेणार; त्याला सरकार 50 हजार देणार... By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 05:39 PM2019-02-18T17:39:10+5:302019-02-18T17:45:29+5:30Join usJoin usNext भारतीय वाहन बाजारात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. येत्या 10 वर्षांत पेट्रोल, डिझेलची कारविक्री बंद होणार आहे. काही कंपन्यांनी तर 2024-25 मध्येच डिझेल, पेट्रोल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांना इलेक्ट्रीक वाहने बनविण्यासाठी एकीकडे सरकार प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे विक्री व्हावी म्हणून ग्राहकांनाही भरघोस सूट मिळणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या कारमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकार या वाहनांवर 50 हजारांची भरघोस सूट देणार आहे. सध्या भारतात इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती या खूपच जास्त आहेत. या किंमती सामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पेट्रोल, डिझेलच्या वाहनांच्या किंमची या वाहनांपेक्षा कमी आहेत. ग्राहकांना मिळणारा लाभ हा इलेक्ट्रीक वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असणार आहे. यामध्ये बॅटरीची क्षमताही विचारात घेतली जाणार आहे. याशिवाय इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्यांना पार्किंग भाडेही माफ केले जाणार आहे. काही राज्यांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांना नोंदणी कर आणि रस्ते करही माफ करण्यात आला आहे. केंद्र सरकारची नवी योजना पूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे. भारतात अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांना प्राधान्य दिले जाते. कारण सीएनजी, इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन पुरेसे उपलब्ध नसणे हे आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती खुपच जास्त आहेत. भारतात गेल्या वर्षी केवळ 56 हजार इलेक्ट्रीक वाहने विकली गेली. यामध्ये 54800 केवळ स्कूटर होत्या. 2017 मध्ये हा आकडा 25 हजार एवढाच होता. टॅग्स :वीजेवर चालणारं वाहनवाहनकेंद्र सरकारelectric vehicleAutomobileCentral Government