Honda Activa पासून TVS Jupiter पर्यंत..., 110cc असलेल्या 'या' 5 सर्वोत्तम स्कूटर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 02:53 PM2023-05-06T14:53:25+5:302023-05-06T15:08:51+5:30

टू-व्हीलरच्या विक्रीत 110 सीसी स्कूटर्सचे प्रमाण जास्त आहे.

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत बाईक्सशिवाय स्कूटर्सलाही मोठी मागणी आहे. स्कटर चालवणे खूप सोपे आहे, त्यामुळे स्कूटर्सच्या विक्रीत वाढ होताना दिसते. ग्राहकांच्या आवडीनुसार स्कूटर्सचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. टू-व्हीलरच्या विक्रीत 110 सीसी स्कूटर्सचे प्रमाण जास्त आहे.

तुम्हालाही एक उत्तम 110 सीसी स्कूटर घ्यायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत. Honda, TVS आणि Hero सारख्या कंपन्या 110 सीसी सेगमेंटमध्ये शानदार स्कूटर्सची विक्री करतात. स्कूटरची खासियत म्हणजे तुम्हाला गीअर्स बदलत बसण्याची गरज नाही. त्यामुळे देशातील पाच शानदार 110 सीसी स्कूटर्स जाणून घ्या...

होंडा अॅक्टिव्हा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. अॅक्टिव्हाला भारतात प्रचंड लोकप्रियता आहे. होंडा अॅक्टिव्हा 6G मध्ये 109.51 सीसी सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 75,347 रुपये ते 81,348 रुपये आहे.

टीव्हीएस ज्युपिटर भारतातही खूप पसंत केली जाते. चेन्नईस्थित टू-व्हीलर कंपनी 109.7 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल फ्युएल इंजेक्टेड इंजिनच्या पॉवरसह ही स्कूटर विकते. स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या स्कूटरसाठी तुम्हाला 72,190 रुपये ते 88,498 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.

हिरो प्लेजर प्लस ही महिलांमध्ये अतिशय प्रसिद्ध स्कूटर आहे. स्कूटरचे हलके वजन आणि कलर शेड अनेक महिलांना आकर्षित करते. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 69,638 ते 78,538 रुपये आहे. प्लेजर प्लसला 110.9 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल FI इंजिनचा सपोर्ट देण्यात आला आहे.

हिरो झूम ही 110 सीसी सेगमेंटमधील नवीन स्कूटर आहे. यात 10.9 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल फ्युएल इंजेक्टेड इंजिनची पॉवर देखील मिळते. वजनाच्या बाबतीतही ही एक हलकी स्कूटर आहे. स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 69,099 रुपये ते 77,199 रुपये आहे.

होंडा डिओ सुद्धा या यादीत सामील आहे. डिओ ही एक अतिशय स्टायलिश स्कूटर आहे, जी महिला आणि पुरुष दोघांमध्येही लोकप्रिय आहे. होंडा डिओची एक्स-शोरूम किंमत 68,625 रुपये ते 72,626 रुपये आहे. यात 109.51 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूलची पॉवर देखील मिळेल.